Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Fronx : फक्त ५० हजारांत घरी आणा स्वप्नातील कार! मिळते 21.79 मायलेज आणि जबरदस्त फीचर्स…

अगदी कमी बजेटमध्ये कार खरेदी करून घरी आणायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. मारुतीची शानदार एसयूव्ही कार तुम्ही फक्त ५० हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

0

Maruti Fronx : प्रत्येकाचे स्वतःच्या मालकीची कार असण्याचे स्वप्न असते. मात्र कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकांना अशा परिस्थितीमध्ये कार खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता अवघ्या ५० हजार रुपयांमध्ये कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.

मारुती सुझुकीने गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांची शानदार Fronx एसयूव्ही सादर केली आहे. या कारची किंमत जरी जास्त असली तरी तुम्ही अवघ्या ५० हजारांमध्ये ही कार घरी आणू शकता. कारमध्ये शानदार फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी Fronx किंमत

मारुती सुझुकीकडून नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि दमदार मायलेज कार सादर केल्या जात आहेत. त्यामुळे मारुतीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीच्या Fronx एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7,46,500 रुपयांपासून सुरू होते या कारची ऑन रोड किंमत 8,37,667 रुपये आहे. जर तुम्हाला ही कार रोख पैसे देऊन खरेदी करायची असेल तर 8.37 लाख रुपये द्यावे लागतील.

फायनान्स आणि EMI योजना

तुम्हालाही कमी बजेटमध्ये Fronx कार खरेदी करायची असेल तर तुम्ही अवघ्या 50 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट भरून कार खरेदी करू शकता. जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी ५० हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरले तर तुम्हाला 7,87,661 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.

तुम्हाला हे कर्ज फायनान्स कंपनीकडून 9.8 टक्के वार्षिक व्याजदरासह दिले जाईल. हे कार कर्ज ५ वर्षांसाठी दिले अजित. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 16,658 रुपये EMI भरावा लागेल.

इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कारमध्ये 1.2L 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 6000 rpm वर 88.50 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क आउटपुट तयार करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही कार 21.79 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.