Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Grand Vitara : शक्तिशाली इंजिन उत्कृष्ट फीचर्स! Grand Vitara खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत, मायलेज आणि खासियत

मारुती सुझुकीकडून गेल्या वर्षभरापूर्वी मिड साईझ एसयूव्ही Grand Vitara बाजारात सादर केली आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Maruti Grand Vitara : देशात एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ होत आहे. अशातच मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक एसयूव्ही कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीने त्यांची हायब्रीड एसयूव्ही कार Grand Vitara ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

मारुती सुझुकीच्या Grand Vitara कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या एसयूव्ही कारमध्ये पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रीड इंजिन पर्याय देण्यात आला आहे. तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर त्याआधी कारची खासियत आणि मायलेज जाणून घ्या.

Grand Vitara किती मायलेज देते?

Grand Vitara कार मायलेजच्या बाबतीत दमदार एसयूव्ही कार आहे. ही कार 27.97kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये टोयोटाकडून विकसित करण्यात आलेले हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे ही कार खरेदी केल्यांनतर तुम्हाला इंधनावर जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

शुद्ध ईव्ही पर्याय उपलब्ध असेल

ग्रँड विटारा कारमध्ये हायब्रीड प्रणाली वापरण्यात आली आहे. ही कार जेव्हा पेट्रोल मोडमध्ये चालते तेव्हा कारची बॅटरी आपोआप चार्ज होते. तसेच जेव्हा तुमची कार 30 किमी/ताशी वेगाने चालते तेव्हा ती बॅटरीवर चालते.

ग्रँड विटारा इंजिन किती शक्तिशाली आहे?

मारुती सुझुकीकडून त्यांच्या ग्रँड विटारा कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन कारमध्ये दिले आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.70 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे.

१ लाखाहून अधिक लोकांची पहिली पसंती

मारुती सुझुकी ही देशातील नंबर वन कार निर्मिती आणि कार विक्री करणारी कंपनी आहे. मारुतीची ग्रँड विटारा कार बाजारात येऊन 12 महिने पूर्ण झाले असून या कालावधीमध्ये या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ लाख लोकांपेक्षा जास्त ग्राहकांनी ही कार खरेदी केली आहे. मारुती सुझुकी ग्रँड विटारा हा टप्पा गाठणारी भारतातील सर्वात वेगवान मध्यम आकाराची एसयूव्ही बनली आहे.