Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Ignis Discount Offer : मारुतीच्या या स्टायलिश कारवर मिळतेय 75 हजारांची बंपर सूट! ऑफर मर्यादित दिवसांठीच

तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण मारुतीच्या स्टायलिश कारवर 75 हजारांची बंपर सूट देण्यात येत आहे.

0

Maruti Ignis Discount Offer : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. अशा काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या शानदार बंपर सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या शानदार कार इग्निसवर 75 हजार रुपयांपर्यंत बंपर सूट देण्यात येत आहे. तुम्हीही ही हॅचबॅक कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी कमी बजेटमध्ये शानदार कार सादर करत असल्याने मध्यमवर्गीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती इग्निस डिस्काउंट ऑफर

मारुती सुझुकी त्यांच्या इग्निस कारवर शानदार ऑफर देत आहे. अलीकडेच मारुतीने ही कार बाजारात सादर केली आहे. ही कार सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी कार कंपनीच्या इग्निस कारवर 35 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देण्यात येत आहे तसेच 25 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. मारुती सुझुकीची ही ऑफर फक्त ३० नोव्हेंबरपर्यंत मर्यादित आहे.

मारुती इग्निस इंजिन

मारुती सुझुकी कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या इग्निस कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 bhp ची पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे.

मारुती इग्निसची वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी इग्निस कारमध्ये 7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ऑटो-फोल्डेबल ORVM आणि 60:40 स्प्लिट रियर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.