Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Invicto : मारुती सुझुकीची सर्वात महागडी कार या दिवशी होणार लॉन्च! मिळणार प्रगत वैशिष्ट्ये, पहा किंमत

मारुती सुझुकी कंपनीची सर्वात महाग कार लवकरच लॉन्च होणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांना परिपूर्ण फीचर्स असलेली कार लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.

0

Maruti Invicto : मारुती सुझुकी कंपनी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. दरवर्षी या कंपनीच्या कार्सचे सर्वाधिक युनिट्स विकले जातात. आता मारुती सुझुकी कंपनीची सर्वात महागडी कार लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीची Invicto MPV ही कार ५ जुलै रोजी भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक दमदार फीचर्ससह लॉन्च होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मारुती सुझुकी कंपनीची सर्वात महागडी कार खरेदीसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या Invicto MPV या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ मिळणार आहे. त्यांची ही पहिलीची कार पॅनोरॅमिक सनरूफसह येणार आहे. त्यामुळे ग्राहक आता मारुती सुझुकी कंपनीची पॅनोरॅमिक सनरूफ असलेली कार खरेदी करू शकतात.

मारुती इन्व्हिक्टो ADAS वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे?

मारुती सुझुकी कंपनीची ही कार टोयोटाच्या इनोव्हा हायक्रॉसवर आधारित कार असणार आहे. त्यामुळे जबरदस्त फीचर्ससह ग्राहकांना आता मारुती सुझुकी कंपनीची ७ सीटर कार खरेदी करता येणार आहे.

या कारमध्ये कंपनीकडून अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. या कारमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्य मिळणार आहे. तसेच कारमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, प्री-कॉलिजन सिस्टीम, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, लेन ट्रेस असिस्ट आणि ऑटो हाय बीम अशी अनेक वैशिष्ट्ये मिळणार आहेत. या कारमध्ये कंपनीकडून ६ एअरबॅग्ज देण्यात येणार आहेत.

मारुती सुझुकी इनव्हिक्टोची अपेक्षित किमत

मारुती सुझुकी कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक महागडी इनव्हिक्टो कार असणार आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 25 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कार फक्त हायब्रिड पॉवरट्रेनस लॉन्च केली जाऊ शकते.

कधी सुरू होईल

मारुती सुझुकी कंपनीकडून इनव्हिक्टो कार ५ जुलै रोजी भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. याच दिवशी कंपनीकडून या कारची किंमत जाहीर केली जाणार आहे. कंपनीकडून अद्याप या कारची किंमत जाहीर करण्यात आली नाही.

बुकिंग कसे होईल?

तुम्हाला मारुती सुझुकी कंपनीची इनव्हिक्टो कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ती बुकिंग देखील करू शकता. ही कार बुकिंग करण्यासाठी तुम्हाला 25,000 रुपये भरावे लागतील. Nexa डीलरशिपद्वारे तुम्ही ही कार बुक करू शकता.