Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

मारुतीने एकदम शांततेत लॉन्च केली ही CNG SUV कार ! मिळेल जबरदस्त इंजिन, भन्नाट फीचर्स अन् स्टायलिश लूक

0

Maruti Fronx CNG : देशाची सर्वात मोठी आणि लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकीने बाजारात आपली नवीन आणि काही महिन्यातच सुपरहिट ठरलेली SUV कार Maruti Fronx चं CNG अवतार लॉन्च केला आहे.

कंपनी या नवीन कारची विक्री Nexa डीलरशिपद्वारे करणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्हाला Maruti Fronx CNG मध्ये नवीन काय काय पाहण्यास मिळणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या कंपनीने अनुक्रमे सिग्मा आणि डेल्टा या दोन व्हेरियंटसह मारुती FRONX S CNG बाजारात आणली आहे. सिग्मा व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8,41,500 रुपये ठेवण्यात आली आहे आणि डेल्टा व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9,27,500 रुपये ठेवण्यात आली आहे.

Maruti Fronx CNG इंजिन
या एसयूव्हीमध्ये ड्युअल व्हीव्हीटी इंजिन वापरण्यात आले आहे. हे 1.2L K-Series Dual Jet इंजिन आहे. ज्याची CNG वरील क्षमता जास्तीत जास्त 77.5 Ps आणि 98.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची आहे. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. कंपनी त्यात 28.51 kmpl चे ARAI प्रमाणित मायलेज देते.

Maruti Fronx CNG फीचर्स
याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला यात 9-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. जो Android Auto आणि Apple CarPlay च्या कनेक्टिव्हिटीसह येतो. याशिवाय यात क्रूझ कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल सारखी अनेक ॲडव्हान्स फीचर्स आहेत.

या एसयूव्हीमध्ये कंपनीने सुरक्षेकडेही खूप लक्ष दिले आहे. सुरक्षिततेसाठी, यात इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ISO फिक्स अँकर यांसारखी ॲडव्हान्स फीचर्स आहेत.