Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki 2023 Cars : मारुती सुझुकीने 2023 मध्ये लॉन्च केल्या या 3 लक्झरी फीचर्स डॅशिंग कार्स ! पहा किंमत

0

Maruti Suzuki 2023 Cars : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीकडून त्यांच्या अनेक स्वस्त लक्झरी फीचर्स कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकी दरवर्षी त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहे. सध्या एसयूव्ही कारच्या मागणीत वाढ झाल्याने मारुती सुझुकी नवीन एसयूव्ही कार सादर करण्यावर अधिक भर देत आहे. मारुतीने 2023 या वर्षात त्यांच्या तीन डॅशिंग एसयूव्ही कार सादर केल्या आहेत.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकीने 2023 एप्रिल महिन्यात त्यांची भारतीय ऑटो मार्केटमध्ये फ्रॉन्क्स एसयूव्ही कार सादर केली आहे. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीने ही एसयूव्ही कार सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, झेटा आणि अल्फा या चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.

कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 100bhp पॉवर आणि 147Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.13 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी जिमनी SUV

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून जून 2023 मध्ये त्यांची शानदार ऑफ रोडींग जिमनी एसयूव्ही कार सादर केली आहे. ही कार थेट महिंद्रा थारशी स्पर्धा करते. Zeta आणि Alpha या दोन व्हेरियंटमध्ये जिमनी एसयूव्ही कार सादर करण्यात आली आहे.

जिमनी एसयूव्ही कारमध्ये 1.5L, 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.05 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या भागीदारीतून अनेक नवनवीन एसयूव्ही का सादर करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मारुतीने टोयोटा Innova Hycross एसयूव्ही कारवर आधारित त्यांची Invicto MPV कार सादर करण्यात आली आहे.

कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.82 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे. ही कार टोयोटाच्या TNGA-C ‘हाय’ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.