Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Baleno : Hyundai i20, Tata Altroz ला टक्कर देते मारुतीची ही प्रीमियम हॅचबॅक कार! 30 Kmpl मायलेज आणि किंमत 7 लाखांपेक्षा कमी…

नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुतीची ही नंबर वन कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ही कार 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तसेच किंमत देखील खूपच कमी आहे.

0

Maruti Suzuki Baleno : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी नंबर वन कार कंपनी आहे. या कंपनीच्या सर्वच कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी किमतीत शानदार मायलेज आणि उत्कृष्ट फीचर्स देण्यात येत असल्याने मध्यमवर्गीयांसाठी मारुतीच्या कार सर्वोत्तम ठरत आहेत.

देशातील सर्वच ऑटो कंपन्यांकडून त्यांचा सप्टेंबर 2023 मधील कार विक्री अहवाल सादर केला आहे. यामध्ये मारुती सुझुकीने कार विक्री प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये शानदार फीचर्स कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मारुती बलेनो सर्वोत्तम कार आहे. ही कार सप्टेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक विक्रीत नंबर वन ठरली आहे.

मारुती सप्टेंबर कार विक्री अहवाल

मारुती सुझुकी कार उत्पदक कंपनीकडून बलेनोची सर्वाधिक 18417 युनिट्सची विक्री केली आहे. त्यानंतर वॅगनआर कारच्या 16250 युनिट्सची विक्री केली आहे, तिसऱ्या क्रमांकावर टाटा नेक्सॉन आहे या कारच्या 15325 युनिट्सची विक्री झाली आहे. मारुतीच्या ब्रेझाच्या 15001 युनिट्स आणि स्विफ्टच्या 14703 युनिट्सची विक्री पाचव्या स्थानावर झाली आहे.

बलेनो कारमध्ये हिल-होल्ड असिस्ट सारखी वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये दोन्ही बाजूस एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच एबीएस प्रणाली आहे, जी सर्व चार चाकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. कारमध्ये हिल-होल्ड असिस्ट, मागील पार्किंग सेन्सर आणि 360-डिग्री कॅमेरा अशी वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.

कारमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे

मारुती सुझुकीच्या प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोमध्ये 1.2 लीटर इंजिन देण्यात येत आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय ऑफर करण्यात येत आहे. कारमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोची सुविधा देखील दिली जात आहे.

कीलेस एंट्री आणि 318 लीटर बूट स्पेस

मारुती सुझुकीच्या बलेनो कारमध्ये 3-पॉइंट सीटबेल्ट, मागील सीटवर चाइल्ड अँकर, ऑटो एसी आणि क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, हेड-अप डिस्प्ले आणि कीलेस एंट्रीची प्रगत वैशिष्ट्ये दिली जात आहेत. बलेनो कार 30.61 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

तसेच पेट्रोलवर 22.94 kmpl मायलेज देते. मारुती बलेनो कारच्या एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे. ही कार Hyundai i20, Tata Altroz ​​आणि Citroen C3 शी स्पर्धा करते.