Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Brezza : लोकप्रिय SUV Brezza खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा ! देते 25.51 Kmpl मायलेज, किंमत फक्त…

0

Maruti Suzuki Brezza : मारुती सुझुकीची ब्रेझा कार देशातील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. मारुती सुझुकीच्या या कारमध्ये ग्राहकांना पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेली एसयूव्ही कार तुमच्या फॅमिलीसाठी चांगला पर्याय आहे.

देशात सध्या एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. तुमचेही बजेट कमी असेल आणि एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ब्रेझा एसयूव्ही कारचा उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा इंजिन

मारुती सुझुकीने त्यांच्या ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये 121.5 Nm पीक टॉर्कसह 86.7 bhp पॉवर जनरेट करते तर पेट्रोल मोडमध्ये 136 Nm टॉर्कसह 99.2 bhp जनरेट करण्यास सक्षम आहे.

हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले असून कारचे सीएनजी व्हेरियंट 25.51 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी किट पर्याय देण्यात आला आहे. ब्रेझा ही मारुतीची पहिली कंपनी फिटेड सीएनजी किट असलेली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा किंमत

ब्रेझा एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे. ब्रेझा एसयूव्ही कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे. कारच्या सीएनजी मॉडेलची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.14 लाख रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी ब्रेझा वैशिष्ट्ये

ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटोसह 7.0-इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऍपल कारप्ले आणि कनेक्टेड कार, EBD सह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, मागील पार्किंग कॅमेरासह रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता अशी अनके वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

ब्रेझा एसयूव्ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi अशा चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ब्रेझा एसयूव्ही कारची लांबी 3995 मिमी, रुंदी 1790 मिमी, उंची 1685 मिमी आणि व्हीलबेस 2500 मिमी देण्यात आला आहे.