Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Brezza : Punch, Creta नाही तर मारुतीच्या डॅशिंग SUV ची ग्राहकांमध्ये क्रेझ, खरेदी केल्या तब्बल इतक्या हजार कार… किंमत फक्त 8 लाख

ऑगस्ट महिन्यातील कार विक्रीचे अहवाल जारी करण्यात आले आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या एसयूव्ही कारने सर्वाधिक विक्रीत अव्वल स्थान मिळवले आह.

0

Maruti Suzuki Brezza : देशातील सर्वच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या कार विक्रीचे अहवाल सादर केले आहेत. ऑगस्ट २०२३ मधील कार विक्रीचे अहवाल सादर झाले आहेत. यामध्ये देखील मारुती सुझुकीने बाजी मारल्याचे दिसत आहे.

मारुती सुझुकीच्या लोकप्रिय एसयूव्ही कारने ह्युंदाई क्रेटा आणि टाटा मोटर्सच्या पंच एसयूव्ही कारला मागे टाकले आहे. टॉप ३ एसयूव्ही विक्रीमध्ये मारुती सुझुकीच्या शानदार एसयूव्हीने अव्वल स्थान मिळवले आहे.

मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी बजेटमध्ये शानदार कार सादर केल्या जात असतात. मारुतीची ब्रेझा एसयूव्ही कार ऑगस्ट २०२३ मधील सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थानी राहिली आहे. या कारने इतर एसयूव्ही कारला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.

तीन सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV

मारुती सुझुकी ब्रेझा ऑगस्ट 2023 मधील विक्री 14,572 युनिट्स
टाटा मोटर्स पंच ऑगस्ट 2023 मधील विक्री 14,523 युनिट्स
Hyundai Creta ऑगस्ट 2023 मधील विक्री 13,832 युनिट्स

मारुती सुझुकीच्या ब्रेझा कारचे ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण 14,572 युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामुळे एसयूव्ही कारच्या विक्रीमध्ये मारुती प्रथम क्रमांकावर आहे. तसेच टाटा पंच 14,523 युनिट्सची विक्री करत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर ह्युंदाई क्रेटा 13,832 युनिट्सची विक्री करत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इंजिन आणि पॉवर

मारुती सुझुकी ब्रेझा कारमध्ये 1.5L K सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 75.8kW चा पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क जनरते करण्यास सक्षम आहे. तसेच ब्रेझा कारचे पटेरॉल व्हर्जन 20.15kmpl मायलेज देते. या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे. ब्रेझा सीएनजी कार 25.51 kmpl मायलेज देते. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

किंमत

मारुती सुझुकी ब्रेझा कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे. ब्रेझा कारला ३२८ लीटर बूट स्पेस देण्यात आली आहे.