Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Car Discount : मारुती सुझुकीच्या या ८ कारवर मिळतेय हजारोंची बंपर सूट! पहा कोणत्या आहेत या कार

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर हजारो रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. तुम्हीही मारुतीची कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

0

Maruti Suzuki Car Discount : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आणि सर्वाधिक कार विक्रीच्या अव्व्ल स्थानी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर मोठी बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे आता कार खरेदीदारांना मोठा फायदा होणार आहे.

मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या ८ कारवर हजारोंची सूट दिली जात आहे. प्रत्येक कारवर वेगवेगळ्या प्रकारे सूट दिली जात आहे. तुम्ही देखील नवीन कार खरेदीवर मोठी सूट मिळवू शकता. जाणून घेऊया कोणत्या कारवर मिळतेय सूट….

1. मारुती सुझुकी अल्टो 800

मारुती सुझुकी कंपनीची काही काळापुरती सर्वाधिक विकली जाणारी अल्टो 800 कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. सध्या कंपनीकडून या कारचे उत्पादन बंद जरी केले असले तरी उर्वरित युनिट्सचा स्टॉक शिल्लक असल्याने या कारवर 30,000 ते 50,000 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

2. मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकी कंपनीची अल्टो K10 या कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.0-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. या कारवर कंपनीकडून 50,000 ते 60,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

3. मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी कंपनीची मिनी SUV कार एस-प्रेसोला देखील अधिक मागणी आहे. या कारमध्ये कंपनीकडून 1.0-लिटर इंजिन दोन गिअरबॉक्स पर्याय आणि CNG पर्याय देखील देण्यात येत आहे. या कारवर कंपनीकडून 55,000 ते 65,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

4. मारुती सुझुकी वॅगन आर

सध्या मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार मारुती सुझुकी वॅगन आर वर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून 45,000 ते 60,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.0-लीटर किंवा 1.2-लीटर पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी पर्याय देखील देण्यात येत आहे.

5. मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी कंपनीची सेलेरियो MT कारवर देखील ६५,००० रुपयांची सूट दिली जात आहे. या कारच्या सीएनजी प्रकारावर ३५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.2 पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे.

6. मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक विक्री होणार स्विफ्ट कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. या कारवर कंपनीकडून 50,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या कारमध्ये 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 90hp पॉवर जनरेट करते. तसेच सीएनजी मॉडेलवर 25,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

7. मारुती सुझुकी Eeco

मारुती सुझुकी कंपनीच्या Eeco पेट्रोल कारवर देखील 39,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच Eeco सीएनजी कारवर 38,000 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

8. मारुती सुझुकी डिझायर

तुम्हीही मारुती सुझुकी कंपनीची डिझायर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण कंपनीकडून या कारवर 17,000 हजर रुपयांची सूट दिली जात आहे.