Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti ची भन्नाट ऑफर! आता स्वस्तात खरेदी करा Wagon R पासून S-Presso पर्यंत ‘ह्या’ जबरदस्त कार्स,पहा फोटो। Maruti Suzuki Car Offers

बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने जुलै 2023 मध्ये आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट जाहीर केला आहे. मात्र हे जाणून घ्या कि ही सवलत Arena  लाइनअपच्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे.

0

Maruti Suzuki Car Offers  :  देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी पुन्हा एकदा भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत मारुती सुझुकीच्या लोकप्रिय आणि बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या कार्स अगदी परडवणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने जुलै 2023 मध्ये आपल्या कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट जाहीर केला आहे. मात्र हे जाणून घ्या कि ही सवलत Arena  लाइनअपच्या मॉडेल्सवर उपलब्ध आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही या भन्नाट ऑफरचा फायदा घेत तुमच्यासाठी जुलै 2023 मध्ये मारुती सुझुकीच्या कोणत्या कोणत्या कार्स घरी आणू शकतात.

Alto 800

या कारचे उत्पादन आता कंपनीने बंद केले आहे परंतु उर्वरित युनिट्स सवलतीत खरेदी करता येतील. जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी केली तर तुम्हाला 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. हे जाणून घ्या कि कार बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक कार आहे.

Alto K10

Alto K10 ही भारतीय बाजारपेठेत Alto 800 ची जागा आहे. हे देखील या महिन्यात 50,000 ते 60,000 रुपयांनी स्वस्त खरेदी केले जाऊ शकते. ही कार 1.0 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिनसह येते.भारतीय ऑटो बाजारात मारुतीची ही सध्या सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली जात आहे.

Maruti Suzuki S-Presso

ही कार मिनी एसयूव्ही सारखी दिसते आणि अधिक ग्राउंड क्लीयरन्स देते. या कारमध्ये Alto K10 प्रमाणे 1.0 लीटर इंजिन देखील आहे. हे 2 गिअरबॉक्स पर्याय तसेच CNG किटने सुसज्ज आहे. तुम्ही या महिन्यात 55,000 ते 65,000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकता.

Maruti Suzuki Wagon R

या यादीतील ही सर्वात लोकप्रिय कार आहे. या महिन्यात कंपनी वॅगन आरच्या जवळपास प्रत्येक व्हेरियंटवर सूट देत आहे. WagonR या महिन्यात 45,000 ते 60,000 रुपयांनी स्वस्त खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात ही कार दरमहा सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप – १० कार्समध्ये असते. उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे ही कार सर्वाधिक विक्री होताना दिसत आहे.