Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Cars Offer : मारुतीच्या कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! या शानदार कारवर मिळतेय 60,000 हजारांची बंपर सूट, ऑफर मर्यादित काळापुरतीच

मारुती सुझुकीच्या कार खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण त्यांच्या अनेक कारवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. या महिन्यात कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.

0

Maruti Suzuki Cars Offer : देशात नवरात्री उत्सव थोड्याच दिवसांत सुरु होणार आहे. तसेच दिवाळी देखील तोंडावर आली आहे. अशा काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. ग्राहकांना कार खरेदीसाठी आकर्षित करण्यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारवर मोठी सूट दिली जाते.

मारुती सुझुकीची कार या महिन्यात खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तो अगदी योग्य आहे. कारण मारुती सुझुकीकडून त्यांच्या कारवर ग्राहकांना 15 ऑक्टोबरपर्यंत हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. तुम्हीही मारुतीची कार खरेदी करून पैशांची बचत करू शकता.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या बलेनो, इग्निस आणि सियाझ या शानदार कारवर मोठी सूट दिली जात आहे. या सर्व मॉडेल्सवर 5,000 रुपयांपर्यंतची ‘नवरात्रपूर्व बुकिंग योजना’ ऑफर केली जात आहे. कंपनीकडून या कारवर ही ऑफर 15 ऑक्टोबरपर्यंतच दिली जाणार आहे.

मारुती सुझुकी इग्निस

मारुती सुझुकीकडून त्यांच्या इग्निस कारवर या महिन्यात हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे इग्निस कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या कारच्या मॅन्युअल गिअरबॉक्स व्हेरियंटवर 65,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

तसेच इग्निस कारच्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिएंटवर 60,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. कारमध्ये कंपनीकडून 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय कारमध्ये ऑफर करण्यात येत आहे.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी बलेनो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. बलेनोच्या पेट्रोल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारांवर 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

तुम्हालाही या कारचे सीएनजी व्हर्जन खरेदी करायचे असेल तर त्यावर 55,000 रुपयांची सूट दिली जात आहे. कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 90hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्स्मिशनसह ऑफर करण्यात आली आहे.

मारुती सुझुकी सियाझ

मारुती सुझुकी सियाझ ही सेडान कार देखील लोकप्रिय आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महिन्यात कारवर 53,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह ही कार ऑफर करण्यात आली आहे. कारमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.