Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Ertiga : Innova Crysta किंवा Fortuner नाही तर या 7 सीटर कारची ग्राहकांना भुरळ! 26Kmpl मायलेजसह विक्रीत ठरली नंबर वन…

Innova Crysta आणि Fortuner सारख्या या तगड्या कारला मारुतीच्या ७ सीटर कारने विक्रीमध्ये मागे टाकले आहे. तसेच या कारची किंमत देखील खूपच कमी आहे.

0

Maruti Suzuki Ertiga : देशातील ऑटो बाजारात आजकाल अनेकजण मोठ्या कुटुंबासाठी कार खरेदी करत असताना ७ सीटर कारचाच पर्याय निवडत असतात. मात्र टोयोटा, किआ आणि महिंद्राच्या ७ सीटर कार खरेदी करणे मध्यमवर्गीयांसाठी सोपे नाही.

कारण टोयोटा आणि महिंद्राच्या ७ सीटर कारच्या किमती खूपच आहेत. त्यामुळे अनेकजण मारुती सुझुकीच्या स्वस्त ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. मारुतीच्या या कारसमोर Mahindra Scorpio, Mahindra Bolero, Kia Carens, Mahindra XUV700, Toyota Fortuner आणि Toyota Innova Crysta या कार देखील फिकट पडल्या आहेत.

मारुती सुझुकी Ertiga कारची ग्राहकांना सर्वाधिक भुरळ असल्याचे पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकी Ertiga कारची ऑगस्ट २०२३ मध्ये 12,315 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये या कारची 9,314 युनिट्स विक्री झाली होती.

जुलै २०२३ मध्ये Ertiga कारची 14,352 युनिट्सची विक्री झाली होती. ऑगस्ट मासिक आधारावर यावर्षी जुलैमध्ये 2,037 युनिट्सची जास्त विक्री झाली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे.

मारुती एर्टिगा इंजिन

मारुती सुझुकी एर्टिगा कारमध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे.

मारुती एर्टिगा व्हर्जनमध्ये 20.51 kmpl मायलेज देते तर सीएनजी व्हर्जनमध्ये ही कार २६.११ किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारमध्ये पॅडल शिफ्टर्स, ऑटो हेडलाइट्स, ऑटो एअर कंडिशन, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती एर्टिगा वैशिष्ट्ये

मारुतीकडून त्यांच्या एर्टिगा ७ सीटर कारमध्ये 7-इंचाच्या टचस्क्रीन युनिटऐवजी 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. कनेक्टेड कार वैशिष्ट्यांमध्ये वाहन ट्रॅकिंग, टो अवे अलर्ट आणि ट्रॅकिंग, जिओ-फेन्सिंग, ओव्हर-स्पीडिंग अलर्ट आणि रिमोट फंक्शन्स अशी वैशिष्ट्ये दिली आहेत तर कारमध्ये 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा देखील देण्यात आला आहे.