Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki eVX SUV : मारुती सुझुकी लॉन्च करणार पहिली इलेक्ट्रिक SUV! सिंगल चार्जमध्ये देणार इतकी मोठी रेंज, पहा सविस्तर

मारुती सुझुकीकडून लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स आणि मजबूत बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.

0

Maruti Suzuki eVX SUV : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याने अनेक कार कंपन्यांकडून त्यांच्या कार सादर केल्या जात आहेत. आता मारुती सुझुकी लवकरच त्यांची लोकप्रिय WagonR कार EV सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये त्यांची eVX SUV सादर केली होती. आता कंपनीकडून पुढील २०२४ या वर्षात त्यांची इलेक्ट्रिक कार सादर केली जाऊ शकते. ही कार Creta EV, Kia Seltos EV आणि Tata Curve EV सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

मारुती सुझुकीने त्यांच्या eWX इलेक्ट्रिक कार सादर केली असली तरी ही WagonR चे इलेक्ट्रिक मॉडेल असल्याचा दावा केला जात आहे. मारुती सुझुकीकडून बऱ्याच दिवसांपासून इलेक्ट्रिक कारवर काम केले जात असल्याचे सांगितले जात आहे. WagonR चे इलेक्ट्रिक मॉडेल भारतात लॉन्च झाल्यानंतर ही कार टाटा टियागो EV, Citroen eC3 आणि MG Comet EV सारख्या कारच्या कारशी स्पर्धा करेल.

कोविड-19 मुळे प्रक्षेपण विलंब झाला

मारुती सुझुकीकडून त्यांच्या eWX इलेक्ट्रिक कारवर २०२० पासून काम सुरु केले आहे. मात्र कोविड-19 साथीच्या महारोगामुळे कारच्या तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता समस्यांमुळे कार लॉन्च करण्यास उशीर झाला.

Rushlane

इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याने आता मारुती सुझुकीकडून त्यांची eWX पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाऊ शकते. या कारला WagonR EV देखील म्हंटले जाऊ शकते.

26 ऑक्टोबर रोजी होणार अनावरण

जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये eWX इलेक्ट्रिक मिनी कार लॉन्च केली जाऊ शकते. जपान मोबिलिटी शो 26 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. या कारची लांबी 3,395 मिमी, रुंदी 1,475 मिमी, उंची 1,620 मिमी असू शकते. ही कार सिंगल चार्जमध्ये 230 Km पर्यंतची रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे. कारमध्ये आकर्षक अलॉय व्हील्स आणि शानदार फीचर्स दिले जाऊ शकतात.

मारुती वॅगनआर इलेक्ट्रिकचे जुने तपशील

मारुती सुझुकी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीकडून 2024-25 मध्ये पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कारमध्ये 26 Kwh चा मजबूत लिथियम आयन बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ही कार सामान्य चार्जरने 6 तासांत आणि 2 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कारमध्ये 400 लिटरची बूट स्पेस मिळू शकते.