Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Fronx : 7 लाख किंमत आणि 32 Kmpl मायलेज! खरेदी करा मारुतीची ही प्रीमियम फीचर्स कार, पहा वैशिष्ट्ये

मारुती सुझुकीच्या अनेक कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सर्वाधिक विक्रीमध्ये या कार टॉप १० कारमध्ये आहेत. 7 लाखांच्या बजेटमध्ये 32 Kmpl मायलेज देणारी कार उपलब्ध आहे.

0

Maruti Suzuki Fronx : नवीन कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते मात्र बजेट कमी असल्याने नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. पण आता अगदी कमी बजेटमध्ये तुमचेही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मारुतीची शानदार कार उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधीक कार विक्री जाणारी कंपनी आहे. तसेच ऑटो क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनीचा आहे. या कंपनीच्या लाखो कार दर महिन्याला विक्री होतात. मारुती सुझुकीची Fronx एसयूव्ही कार कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी Fonx एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. ही कार खरेदीसाठी ग्राहकांना आता 4 महिन्यांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. या कारच्या निर्यातीमध्ये देखील वाढ होत आहे.

मारुती Fronx किंमत

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारची किंमत देखील कमी आहे. ही कार 7.46 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.13 लाख रुपये आहे. कार 14 व्हेरियंटमध्ये ऑफर करण्यात आली आहे.

इंजिन

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. तर सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. पहिले 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तर दुसरे 1.2 लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 22 ते 23 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हर्जनमध्ये ही कार 30 ते 32 किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जिंगसह 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 360 डिग्री कॅमेरा, ABS, EBD, सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल-होल्ड असिस्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.