Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Fronx : जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन! मारुतीची ही कार 10 सेकंदात पकडते 100 KMPH स्पीड

मारुती सुझुकीकडून अगदी कमी बजेटमध्ये त्यांची वेगवान कार सादर केली आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिन दिले आहे जे 10 सेकंदात 100 KMPH स्पीड पकडण्यास सक्षम आहे.

0

Maruti Suzuki Fronx : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या शानदार लूक आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या वेगवान कार उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी देखील त्यांच्या नवीन कारमध्ये शक्तिशाली इंजिन देत आहे. या कार कमी वेळात अधिक वेगवान धावण्यास परिपूर्ण आहेत.

ऑटो मार्केटमध्ये नवीन वेगवान कार खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या किमती अधिक असल्याचे पाहायला मिळते. मात्र तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये 10 सेकंदात 100 KMPH स्पीड पकडणारी मारुतीची स्टायलिश कार खरेदी करू शकता.

तुमचेही बजेट कमी असेल आणि वेगवान कार खरेदी करायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकीच्या Fronx कारचा पर्याय निवडू शकता. या कारमध्ये कंपनीकडून शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे.

मारुती फ्रॉन्क्स स्पीड

मारुती सुझुकी Fronx कारचा लूक अतिशय आकर्षक देण्यात आला आहे. ही कार जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे. ही कार केवळ 10.38 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते.

मारुती सुझुकी Fronx कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तसेच कारमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 90 PS ची पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 100 पीएस पॉवर आणि 148 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 25 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5 स्पीड आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे.

मारुती फ्रॉन्क्स किंमत

मारुती सुझुकी नेहमी त्यांच्या ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये कार उपलब्ध करून देत आहे. Fronx कार देखील अगदी कमी बजेटमध्ये सादर केली आहे. Fronx कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.72 लाख रुपये आहे.

मारुती फ्रॉन्क्स सुरक्षा वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी Fronx कारमध्ये जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मानक म्हणून ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, पडदा आणि साइड एअरबॅग्ज अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.