Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Invicto Waiting Period : मारुतीची आलिशान इनव्हिक्टो खरेदीचा प्लॅन आहे? तर त्याआधी जाणून घ्या प्रतीक्षा कालावधी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची सर्वात महागडी Invicto कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला बुकिंगपासून काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. या कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Maruti Suzuki Invicto Waiting Period : मारुती सुझुकीकडून भारतीय ऑटो मार्केटमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित अनेक नवीन कार सादर केल्या आहेत. या कारला देशातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मारुती सुझुकी देशातील नंबर वन कार कंपनी बनली आहे.

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या भागीदारीतून अनेक नवनवीन कार सादर करण्यात आल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मारुती सुझुकीने Innova Hycross कारवर त्यांची Invicto कार सादर केली आहे.

मारुती सुझुकीने टोयोटाच्या Innova Hycross वर आधारित Invicto ही त्यांची सर्वात महागडी कार सादर केली आहे. या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

तुम्हालाही मारुती सुझुकीची Invicto ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घ्यावा लागेल. ही कार खरेदीसाठी सध्या ग्राहकांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मारुती सुझुकीने त्यांची Invicto कार जुलै 2023 मध्ये लाँच केली आहे. या कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे. इनोव्हा हायक्रॉसवर आधारित, जी सध्या भारतातील सर्वाधिक विकली जाणारी हायब्रीड कार आहे. मारुतीने Invicto कार Zeta आणि Alpha+ या दोन व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.

Invicto चा प्रतीक्षा कालावधी किती आहे?

तुम्हाला मारुती सुझुकीची Invicto कार खरेदी करायची असेल 8 ते 10 महिने प्रतीक्षा करावी लागेल. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसचा प्रतीक्षा कालावधी ZX आणि ZX (O) साठी 15 महिने आहे. त्यामुळे तुम्हाला Invicto कार खरेदी करण्यासाठी बुकिंगपासून 8 ते 10 महिने प्रतीक्षा करावी लागेल.

मारुती सुझुकी Invicto किंमत किती आहे?

मारुती सुझुकीची Invicto ही सर्वात महागडी कार आहे. Invicto कारच्या बेस मॉडेल Zeta+ 7-सीटर व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपये आहे तर Zeta+ 8-सीटरची एक्स शोरूम किंमत 24.84 लाख रुपये आहे. Invicto Alpha+ 7-सीटरची एक्स शोरूम किंमत 28.42 लाख रुपये आहे. कारमध्ये आलिशान फीचर्स दिले गेले आहेत. तसेच आकर्षक पॅनोरॅमिक सनरूफ कारमध्ये उपलब्ध आहे.