Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Jimny Price : मारुतीने गुपचूप लॉन्च केले जिमनीचे स्पेशल एडिशन, पहा किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकीने त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारचे स्पेशन एडिशन लॉन्च केले आहे. या कारची किंमत देखील कंपनीकडून कमी ठेवण्यात आली आहे.

0

Maruti Suzuki Jimny Price : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची ऑफ रोडींग एसयूव्ही कार जिमनी लॉन्च करण्यात आली आहे. ही कार ऑटो मार्केटमध्ये महिंद्रा थारशी टक्कर देते. आता अलीकडेच कंपनीकडून कारचे स्पेशल एडिशन भारतात लॉन्च केले आहे.

मारुती सुझुकीने जिमनी एसयूव्ही कारचे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. मारुतीने या एडिशनचे नाव थंडर ठेवले आहे. मारुती जिमनी थंडर एडिशन Zeta आणि Alpha या दोन्ही व्हेरियंटमध्ये सादर केली आहे.

मारुती जिमनी स्पेशल एडिशन किंमत

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांची जिमनी ऑफ रोडींग एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये सादर केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.74 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स शोरूम किंमत 14.05 लाख रुपयांपर्यंत जाते.

जिमनी थंडर एडिशनमध्ये काय खास आहे?

मारुती सुझुकीने त्यांच्या जिमनी एसयूव्हीच्या थंडर एडिशनमध्ये फ्रंट स्किड प्लेट, साइड डोअर क्लेडिंग, डोअर व्हिझर, डोअर सिल गार्ड, ग्रिप कव्हर, फ्लोअर मॅट्स आणि रस्टिक टॅनमधील बाह्य भागावर ग्राफिक्स दिले आहेत. तसेच फ्रंट बंपर, ORVM, साइड फेंडर आणि हूडवरही गार्निश देण्यात आले आहे.

मारुती जिमनी इंजिन

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारच्या स्पेशन एडिशनमध्ये पहिलेच इंजिन कायम ठेवले आहे. कारमध्ये 1.5-लिटर, 4-सिलेंडर, K-सिरीज नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे.

जे 103 bhp पॉवर आणि 134 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. जिमनी एसयूव्हीचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले आहे.

मारुती जिमनी डायमेंशन

मारुती सुझुकी कार कंपनीकडून जिमनी एसयूव्हीची लांबी 3,985 मिमी, उंची 1,720 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि व्हीलबेस 2,590 मिमी देण्यात आला आहे. कारमध्ये जबरदस्त फीचर्स जोडले गेले आहेत.

मारुती जिमनी फीचर्स आणि सुरक्षा वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारमध्ये पुश स्टार्ट/स्टॉप बटण, क्रूझ कंट्रोल, लेदरेट स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट देण्यात आली आहे.

तसेच जिमनी एसयूव्हीमध्ये ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प, हेडलॅम्प वॉशर, फॉग लॅम्प, गडद हिरव्या काचेच्या खिडक्या, बॉडी कलर डोअर हँडल, अलॉय व्हील आणि इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओआरव्हीएम अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

मारुती जिमनी एसयूव्ही कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा, ब्रेक असिस्ट फंक्शन अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.