Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Swift 2024 : नवीन स्विफ्टला मिळणार शक्तिशाली हायब्रीड इंजिन, देणार पहिल्यापेक्षा जास्त मायलेज

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या स्विफ्ट कारचे नवीन मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये नवीन हेब्रिडी इंजिन पर्याय दिला जाणार आहे.

0

Maruti Suzuki Swift 2024 : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो कार दरवर्षी विकल्या जात आहेत. मारुती सुझुकीच्या कारला बाजारात प्रचंड मागणी आहे. आता मारुती सुझुकी २०२४ मध्ये त्यांच्या नवीन कार सादर करणार आहे.

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय स्विफ्ट कारचे न्यू जनरेश २०२४ मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले जाणार आहे. जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये मारुतीने नवीन स्विफ्ट कार हायब्रीड इंजिनसह सादर केली आहे.

मारुती सुझुकीची स्विफ्ट कार देशातील नंबर वन विक्री होणारी सेडान कार आहे. आता सध्या स्विफ्ट कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात येत आहे मात्र आता कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय देखील दिला जाण्याची शक्यता आहे.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये हायब्रीड कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मारुती सुझुकी त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये देखील हायब्रीड इंजिन पर्याय देऊ शकते. सध्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय देण्यात येत आहे.

मारुती स्विफ्ट हायब्रिडचे डायमेंशन

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांच्या स्विफ्ट हायब्रीड कारची लांबी 3860 मिमी, रुंदी 1695 मिमी, उंची 1530 मिमी आणि 2,540 मिमी देण्यात आला आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

मारुती स्विफ्ट हायब्रिड मायलेज

स्विफ्ट कारमध्ये नवीन हायब्रीड इंजिन पर्याय दिला जाणार असल्याने कारच्या मायलेजमध्ये देखील चांगली वाढ होईल. 2024 Swift च्या नॉन-हायब्रिड CVT चे मायलेज 23.4Kmpl आहे तर Swift MT चे मायलेज 22.38 Kmpl आहे. स्विफ्टचे हायब्रिड CVT चे मायलेज 24.5 Kmpl असेल

मारुती स्विफ्ट हायब्रीड इंजिन

स्विफ्ट कारमध्ये 1.2L तीन-सिलेंडर NA Z12E पेट्रोल इंजिन नवीन जनरेशन स्विफ्टमध्ये K12C युनिटची जागा घेईल. नवीन स्विफ्ट कारमध्ये सौम्य हायब्रिड इंजिन MZ आणि MX या व्हेरियंटमध्ये दिले जाईल. नवीन जनरेशन स्विफ्ट एकूण 13 रंग पर्यायांमध्ये येईल. 9 सिंगल-टोन आणि 4 ड्युओ-टोन रंगांचा समावेश असेल.