Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Swift : मारुतीची 6 लाखांची लोकप्रिय स्विफ्ट घरी आणा अवघ्या 1 लाखांत, इथे पहा सर्व माहिती

0

Maruti Suzuki Swift : भारतीय ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या सर्वच कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा काळात मारुती सुझुकी त्यांच्या आणखी नवीन कार सादर करून त्यांचा ऑटो विस्तार वाढवत आहे.

मारुती सुझुकीची हॅचबॅक कार स्विफ्ट ही लोकप्रिय कारपैकी एक आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरमहा काही हजारो युनिट्स विकली जात आहेत. कारमध्ये जबरदस्त वैशिष्ट्ये आणि स्पोर्टी लूक देण्यात आल्याने ग्राहकांना देखील या कारची भुरळ पडत आहे.

मात्र मारुती सुझुकीची स्विफ्ट कार खरेदी करण्यासाठी तुमचे देखील बजेट कमी असेल काळजी करू नका. स्विफ्ट हॅचबॅक कार तुम्ही 1 लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता. त्यामुळे तुमच्याकडे 6 लाख रुपये असण्याची गरज नाही.

मारुती स्विफ्ट किंमत आणि वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांची स्विफ्ट कार चार व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा चार मॉडेलमध्ये ही कार विकली जात आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपयांपर्यंत जाते.

स्विफ्ट हॅचबॅक कारमध्ये 1197 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये CNG पर्याय देखील देण्यात आला आहे. कारचे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आलेले आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 22.56 kmpl आणि CNG व्हेरियंट 30.90 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती स्विफ्ट 1 लाखांत कशी खरेदी करायची?

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या स्विफ्ट कारवर EMI पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्विफ्ट LXI मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख आहे तर ऑन रोड किंमत 6,58,244 रुपये आहे.

जर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाऊनपेमेंट केले तर तुम्हाला 9% व्याजदराने 5,58,244 रुपयांचे कार लोन दिले जाईल. पाच वर्षांसाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी दरमहा 11,588 रुपये EMI भरावा लागेल.

मारुती सुझुकीची स्विफ्ट कार कमी बजेटमध्ये खरेदी करण्याचे स्वप्न तुम्ही आता सहज पूर्ण करू शकता. तुम्हीही EMI वर स्विफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जवळच्या मारुती सुझुकीच्या डिलरशिपमध्ये जाऊन याबाबत अधिक माहिती घेऊ शकता.