Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Swift : 6 लाखात खरेदी करा मारुतीची बोल्ड लूक मायलेज किंग कार! देते 30 Kmpl मायलेज

तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्पोर्टी लूक कार खरेदी करायची असेल तर मारुतीच्या लोकप्रिय सेडान कारचा पर्याय बाजारात उपलब्ध आहे. ही कार 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

0

Maruti Suzuki Swift : प्रत्येकाचे कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे कारच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. कारच्या किमतीत वाढ झाल्याने कमी बजेट ग्राहकांना कार खरेदी करणे अशक्य झाले आहे. पण आता तुम्ही देखील अगदी ६ लाखात कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. अशात तुम्ही अगदी ६ लाखात 30 Kmpl मायलेज देणारी शानदार सेडान कार खरेदी करू शकता. मारुतीची स्विफ्ट सेडान कार देशातील लोकप्रिय सेडान कार ठरली आहे.

बोल्ड लुक

मारुती सुझुकीची स्विफ्ट सेडान कार आजपर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त घरात पोहचली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारला आकर्षक बोल्ड लूक देण्यात आला आहे. लवकरच स्विफ्ट कारचे न्यू जनरेशन मॉडेल लाँच केले जाणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्विफ्ट कारने लाखो ग्राहकांच्या मनावर कब्जा केला आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट इंजिन

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले आहे जे 90 BHP पॉवर जनरेट करण्यास मदत करते. कारचे हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये ऑफर करण्यात आली आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 22.38 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी मॉडेल 30.9 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट किंमत

मारुती सुझुकी नेहमीच मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या कार सादर करत असते. त्यांच्या स्विफ्ट सेडान कारची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपये आहे. सीएनजी स्विफ्ट कारची एक्स शोरूम किंमत 7.85 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये कमी बजेटमध्ये आकर्षक फीचर्स दिले आहेत. 7.0 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी आणि उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट, एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, क्रूझ कंट्रोल, 4.2 इंच रंगीत ड्रायव्हर डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये दिले आहेत.

तर स्विफ्ट सेडान कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड कंट्रोल, ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी असे दमदार फीचर्स दिले आहेत. कमी बजेट ग्राहकांसाठी ही एक उत्तम कार आहे.