Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Swift : सर्वाधिक विक्री आणि दमदार मायलेज देणारी Swift सेडान खरेदी करायचीय? तर त्याआधी जाणून घ्या किती आहे प्रतीक्षा कालावधी

मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार स्विफ्ट खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला त्याआधी या कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे.

0

Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणार मोठी ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या दर महिन्याला लाखो कारची युनिट्स विकली जात आहेत. मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी किमतीमध्ये शानदार कार सादर केल्या जात आहेत.

मारुती सुझुकीची स्विफ्ट सेडान कार सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून स्विफ्ट कार देशातील विक्रीमध्ये नंबर वन राहिली आहे. तुम्हीही मारुती स्विफ्ट कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे.

प्रतीक्षा कालावधी किती आहे?

मारुती सुझुकीची हॅचबॅक कार स्विफ्ट खरेदीसाठी ग्राहकांना आता जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे. ही कार खरेदीसाठी ग्राहकांना 4 महिन्यांहून अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय स्विफ्ट कारचे नवीन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या कारची लांबी 3,845 मिमी, रुंदी 1,735 मिमी आणि उंची 1,530 मिमी देण्यात आली आहे. 163 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि व्हीलबेस 2,450 मिमी देण्यात आला आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी कार उपटकड्क कंपनीकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये कमी किमतीत सर्वाधिक फीचर्स दिले जात आहेत. कारमध्ये ड्युअल-पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 7-इंच स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम, एलईडी हेडलॅम्प आणि टेल-लॅम्प, एलईडी डीआरएल आणि एक निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप सिस्टम, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, ऑटो एसी अशी वैशिष्ट्ये दिली जात आहेत.

तसेच कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी देखील ऑफर केली जात आहे. मारुती स्विफ्ट कार मॅन्युअलमध्ये 22.38 किमी प्रति लिटर आणि AMT मध्ये 22.56 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट व्हेरियंट

मारुतीकडून त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये म्हणून रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा, सीट बेल्ट रिमाइंडर, वेग-संवेदनशील स्वयंचलित दरवाजे, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट, चाइल्ड सीट अँकरेजसह ISOFIX, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

कारमध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशी चार व्हेरियंट ऑफर करण्यात आली आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपये आहे.