Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Apple CarPlay, Android Auto कनेक्टिव्हिटीसह ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ सुपरहिट कार्स; किंमत आहे फक्त ..। Maruti Suzuki Swift

या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात अगदी कमी किमतीमध्ये Apple CarPlay, Android Auto कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये एक बेस्ट कार खरेदी करू शकतात

0

Maruti Suzuki Swift : आज ग्राहकांची मागणी लक्षात घेत भारतीय ऑटो बाजारात एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्ससह नवीन नवीन कार लाँच होताना दिसत आहे.आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात कमी किमतीमध्ये शानदार फीचर्ससह येणाऱ्या अनेक कार्स उपलब्ध आहे.

ज्यांना तुम्ही खरेदीचा विचार करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात अगदी कमी किमतीमध्ये Apple CarPlay, Android Auto कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये एक बेस्ट कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त मस्त कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी फीचर्स

परवडणाऱ्या कारमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सामान्य झाली आहे. तुम्ही Android फोन वापरत असाल किंवा तुमच्याकडे Apple iPhone असला तरीही, दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिममधील अनेक अॅप्स तुमच्या कारच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमवर मिरर केले जाऊ शकतात.

Maruti Suzuki Alto K10

मारुती ही भारतीय बाजारपेठेत मोटारींची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया मारुती सुझुकी अल्टो K10 ही Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह येणारी भारतातील सर्वात स्वस्त कार आहे. हे फीचर्स टॉप-एंड VXI प्लस व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याची किंमत 5.35 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki S-Presso

मारुती सुझुकीची S-Presso टॉप-एंड VXI+ व्हेरियंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील देते. या कारची किंमत 5.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यामध्ये तुम्हाला आणखी अनेक फीचर्स मिळतील. Tata Tiago टाटा ही भारतीय बाजारपेठेतील कार विकणारी सर्वात मोठी कंपनी आहे. यात 7-इंचाची टचस्क्रीन देखील आहे जी तुमचा Android किंवा iOS फोन मिरर करू शकते. त्याची किंमत 6.68 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki WagonR

मारुती वॅगनआर ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. WagonR Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह टॉप-एंड ZXI प्लस व्हेरियंटसह येते. त्याची किंमत 6.75 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Ignis

या कारमध्ये तुम्हाला 7 इंची इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल. इग्निसच्या Zeta व्हेरियंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे, ज्याची किंमत 6.96 लाख रुपये आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स देखील दिले आहेत.

Hyundai Grand i10 NIOS

ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. या कारमध्ये तुम्हाला Sportz ट्रिममधून Apple CarPlay आणि Android Auto मिळेल. या कारची किंमत 7.22 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

Maruti Suzuki Swift

आमच्या यादीत मारुतीची आणखी एक कार आहे. या कारमध्ये तुम्हाला Apple CarPlay आणि Android Auto मिळेल. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.63 लाख रुपये आहे. या कारमध्येही तुम्हाला अनेक फीचर्स मिळतील.