Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी पुढील वर्षी लॉन्च करणार नवीन स्विफ्ट ते eVX सारख्या जबरदस्त कार, पहा यादी

0

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील ऑटो विस्तार वाढवण्यासाठी ऑटो मार्केटमध्ये नवनवीन कार लॉन्च करत आहे. 2024 या नवीन वर्षात देखील मारुती सुझुकी स्विफ्ट ते eVX सारख्या जबरदस्त कार लॉन्च करणार आहे.

मारुती सुझुकी 2024 मध्ये नवीन कार लॉन्च करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. कारण मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक कारची चाचणी देखील सुरु केली आहे. तसेच 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने त्यांच्या कार देखील सादर केल्या होत्या.

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीची नवीन जनरेशन स्विफ्ट कार देखील 2024 मध्ये लॉन्च केली जाणार आहे. टोकियो मोटर शोमध्ये नवीन जनरेशन स्विफ्ट कार सादर करण्यात आली आहे. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक माथे बदल करण्यात आले आहेत.

नवीन जनरेशन स्विफ्ट कारच्या केबिनमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटी, ड्युअल-टोन ब्लॅक अँड व्हाइट इंटीरियर थीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, 360-डिग्री कॅमेरा आणि अॅम्बियंट लाइटिंगसह एक मोठी फ्लोटिंग नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असे फीचर्स देण्यात येतील. तसेच कारमध्ये K12E, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. त्यासोबतच 48V हायब्रीड इंजिन पर्याय देखील दिला जाणार आहे.

मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी कार कंपनीकडून त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार eVX देखील 2024 मध्ये लॉन्च केली जाणार आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये eVX कार सादर करण्यात आली होती. कारमध्ये 60kWh बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देण्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

मारुती सुझुकीची eVX इलेक्ट्रिक कार ग्रँड विटारा आणि Fronx एसयूव्ही कारसारखी दिसत आहे. कारच्या टेलगेटवर जाड LED बार, वक्र LED टेल लॅम्प, एक जाड बंपर आणि ‘EVX’ बॅज देण्यात आला आहे.

नवीन मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकी कार कंपनी त्यांची डिझायर कार देखील नवीन अवतारात सादर करणार आहे. या कारवर देखील कंपनीकडून वेगाने काम सुरु केल्याचे सांगितले जात आहे. नवीन डिझायर कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल केले जाणार आहेत. तसेच इंजिनमध्ये देखील बदल होऊ शकतो.