Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती लॉन्च करणार या स्टायलिश कार्स! नवीन स्विफ्टसह पहिल्या ईव्ही कारचा समावेश…

मारुती सुझुकी लवकरच त्यांच्या आणखी नवीन कार भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये एका ईव्ही कारचा देखील समावेश आहे.

0

Maruti Suzuki Upcoming Cars : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार सर्वाधिक विक्री होत आहेत. तसेच मारुतीकडून कमी किमतीत शानदार कार सादर केल्या जात असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय ऑटो क्षेत्रात कारच्या मागणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या शानदार कार सादर करत आहेत. आता मारुती सुझुकीकडून देखील त्यांच्या नवीन कार लवकरच सादर केल्या जाऊ शकतात.

भारतीय बाजारपेठेतील विस्तार आणि मजबूत करण्यासाठी मारुती सुझुकीकडून त्यांची पहिली ईव्ही आणि आणखी दोन लोकप्रिय कारचे नवीन व्हेरियंट लॉन्च केले जाणार आहे. त्यामुळे कमी बजेट ग्राहकांसाठी आणखी नवीन कार उपलब्ध होणार आहेत.

नवीन मारुतीची कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण स्विफ्ट कारसह एर्टिगा कारचे देखील नवीन मॉडेल भारतात सादर केले जाणार आहे. तसेच इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने मारुती त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे.

नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर कॉम्पॅक्ट सेडान 2024 सुरुवातीला मारुतीकडून लॉन्च केल्या जाऊ शकतात. EXV संकल्पनेवर आधारित मारुती सुझुकी पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे.

नवीन-जनरेशन मारुती स्विफ्ट/डिझायर

नवीन जनरेशन मारुती स्विफ्ट आणि डिझायर सेडान कारमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. कारचे फीचर्स बदलले जाऊ शकतात तसेच कारच्या मायलेजमध्ये देखील बदल पाहायला मिळतील.

दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2 लिटर तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळू शकते जे टोयोटाच्या मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानाने सुसज्ज असू शकते. त्यामुळे या कारमध्ये हायब्रीड इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे. मारुती सुझुकी या दोन्ही कार 2024 मध्ये लॉन्च करू शकते.

 

मारुती ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयूव्ही

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये होत असलेल्या वाढ पाहता मारुती त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. 2025 मध्ये देशभरात ईव्हीएक्स संकल्पनेवर पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च केली जाऊ शकते. कारमध्ये 60kwh चा बॅटरी पॅक दिला जाईल त्यामुळे सिंगल चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक कार 500 किमीची रेंज देऊ शकते.

मारुती 7-सीटर एसयूव्ही

मारुती सुझुकीची एर्टिगा ही ७ सीटर कार सर्वाधिक लोकप्रिय फॅमिली कर आहे. आता मारुतीकडून ग्रँड विटारावर आधारित त्यांची नवीन ७ सीटर कार सादर केली जाणार आहे. कारमध्ये सौम्य हायब्रिड इंजिन दिले जाऊ शकते. कारमध्ये 1.5L K15C पेट्रोल इंजिन आणि टोयोटाचे 1.5L ऍटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे.