Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Upcoming Cars : जबरदस्त इंजिनसह लवकरच लाँच होणार मारुतीच्या ‘या’ कार्स, जाणून घ्या अधिक

भारतीय बाजारात लवकरच मारुतीच्या कार्स लॉन्च होणार आहेत, जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती.

0

Maruti Suzuki Upcoming Cars : बाजारात आता सर्व प्रकारच्या कार्स लाँच होऊ लागल्या आहेत. प्रत्येक कारची किंमत वेगळी असते. तसेच तिचे फीचर्सही वेगळे असते. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतिही कार खरेदी करू शकता. जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण आता भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपली नवीन कार लाँच करणार आहे. ज्यात तुम्हाला जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन पाहायला मिळेल. प्रत्यक्ष कारमध्ये वेगळे फिचर असेल हे लक्षात घ्या.

मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी eVX संकल्पनेवर आधारित इलेक्ट्रिक SUV ही देशातील मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. भारतीय बाजारात ही कार 2025 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे ही इलेक्ट्रिक एसयूव्ही नाविन्यपूर्ण बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल. कारची लांबी 4300 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि उंची 1600 मिमी असू शकते. या EV मध्ये 60kWh चा बॅटरी पॅक असेल जो एका चार्जवर 500 किमीची रेंज देईल.

नेक्स्ट जनरेशन सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेक्स्ट जनरेशन सुझुकी स्विफ्ट आणि डिझायरमध्ये डिझाइन, फीचर्स आणि मायलेजच्या बाबत खूप बदल होतील. कंपन्यांच्या या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2L, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. जे टोयोटाच्या स्ट्राँग हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही मॉडेल पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये भारतात लॉन्च केले जाईल. त्यांचे मायलेज 35-40 किमी प्रतितास पर्यंत असण्याची शक्यता आहे.

मारुती 7-सीटर एसयूव्ही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती आपली एक नवीन तीन-लाइन SUV बनवत असून ज्याचे सध्या कोडनेम Y17 आहे. ग्रँड विटारावर आधारित असणारी ही शानदार एसयूव्ही असण्याची शक्यता आहे. या मॉडेलमध्ये सौम्य हायब्रीड तंत्रज्ञानासह 1.5L K15C पेट्रोल इंजिन असेल.