Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki Wagon R : 5 लाखात खरेदी करा 34 Kmpl मायलेज देणारी मारुतीची सुपर कार! मिळतात उत्तम फीचर्स

कमी किमतीत उत्तम मायलेज देणारी मारुतीची सुपर कार तुम्ही अवघ्या ५ लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Maruti Suzuki Wagon R : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी ऑटो कंपनी आहे.

मारुती सुझुकीच्या कार मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर कार ठरत आहेत. दरवर्षी या कंपनीच्या लाखो कार विकल्या जात आहेत. तसेच सर्वाधिक कार विक्रीमध्ये मारुती अव्वल स्थानी आहे. मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी वॅगन आर प्रीमियम हॅचबॅक कार तुमच्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकीची वॅगन आर हॅचबॅक कार ऑक्टोबर २०२३ मधील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये वॅगन आर कारच्या 22,080 युनिट्सची विक्री झाली आहे.

मारुती वॅगन आर किंमत

कमी बजेटमध्ये शानदार मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर वॅगन आर कार उत्तम पर्याय आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे.

मारुती वॅगन आर वैशिष्ट्ये

मारुती वॅगन आर कारमध्ये 4-स्पीकर म्युझिक सिस्टीम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, 14-इंच अलॉय व्हील आणि मागील पार्किंग सेन्सर्स, 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर स्टीयरिंग, अॅडजस्टेबल वैशिष्ट्ये आहेत.

तसेच सुरक्षेसाठी रीअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन अँटी-लॉक, ब्रेकिंग सिस्टीम अलॉय, व्हील फॉग, लाइट्स – फ्रंट पॉवर, विंडो रिअर पॉवर, विंडो फ्रंट व्हील, कव्हर्स पॅसेंजर, एअरबॅग अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मारुती वॅगन आर इंजिन

मारुती सुझुकी वॅगन आर कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय दिला आहे. कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे हे इंजिन 67 PS आणि 89 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे तर दुसरे 1.2-लिटर पेट्रोल इंजिन 90 PS आणि 113 Nm जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचे सीएनजी व्हेरियंट 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. वॅगन आर कारचे सीएनजी मॉडेल 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर पेट्रोल व्हेरियंट 24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.