Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

झाले जुगाड! 34 KM मायलेज देणारी ‘ही’ हॅचबॅक कार मिळत आहे फक्त 72 हजारात; जाणून घ्या कुठे मिळतेय संधी?। Maruti Suzuki Wagon R

मारुती सुझुकीच्या एका मस्त आणि बेस्ट सीएनजी कार बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही अवघ्या 72 हजारात तुमच्यासाठी सर्वात भारी सीएनजी कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या बेस्ट सीएनजी कारबद्दल संपूर्ण माहिती.

0

Maruti Suzuki Wagon R : जर तुम्ही एक मस्त आणि बेस्ट सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या सीएनजी कार सेगमेंटमध्ये ग्राहकांना आज मारुती सुझुकी एकापेक्षा एक मस्त मस्त कार्स ऑफर करत आहे. ग्राहकांना या कारमध्ये कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेज देखील कंपनीकडून ऑफर केले जात आहे.

या लेखात आम्ही देखील तुम्हाला मारुती सुझुकीच्या एका मस्त आणि बेस्ट सीएनजी कार बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही अवघ्या 72 हजारात तुमच्यासाठी सर्वात भारी सीएनजी कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या बेस्ट सीएनजी कारबद्दल संपूर्ण माहिती.

हे जाणून घ्या कि या लेखात आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Wagon R बद्दल बोलत आहोत. भारतात ही कार मध्यमवर्गीय कौटुंबिक कार बनली आहे.  जर तुम्ही वॅगन आर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बजेट थोडे कमी असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही थोडे डाऊनपेमेंट करून कार लोनद्वारे ही कार सहज घेऊ शकता. त्याचा हप्ता देखील खूप कमी असेल आणि तुम्ही कारची किंमत कमी वेळात भरण्यास सक्षम असाल. Wagon R वर फायनान्स स्कीम काय आहे आणि हप्ता किती येईल हे जाणून घेऊया.

Maruti Suzuki Wagon R CNG फायनान्स प्लॅन

जर तुम्ही वॅगन आर चे Lxi CNG व्हेरियंट विकत घेतले आणि ऑन-रोड किमतीवर वित्तपुरवठा केला तर त्याची किंमत रु. 7.26 लाख आहे. यावर तुम्ही 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने 90 टक्के कर्ज घेतल्यास तुम्हाला72600 रुपये डाउन पेमेंट म्हणून डाउन पेमेंट करावे लागेल.

तुम्हाला दरमहा 13,564 रुपयांचा EMI भरावा लागेल. तुम्हाला या संपूर्ण कर्जावर व्याज म्हणून 1,60,411 रुपये द्यावे लागतील. सोप्या भाषेत सांगायचे तर रु. 7.26 लाख किंमतीच्या वॅगन आरसाठी, तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधीत मुद्दल आणि व्याज म्हणून 8,13,811 रुपये द्यावे लागतील. जवळपास सर्व बँका आणि NBFC या कारला वित्तपुरवठा करतात. तथापि, कर्ज हे वित्तीय संस्थेच्या अटी व शर्तींच्या आधारे आणि तुमच्या आर्थिक प्रोफाइलच्या आधारे केले जाते.

Maruti Suzuki Wagon R CNG  मायलेज

वॅगन आर कमी मेंटेनेंस आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. कारचे मायलेज CNG मॉडेलवर 34 kmpl आणि पेट्रोलवर 25 kmpl पर्यंत आहे. कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. यात 1.0 पेट्रोल आणि 1.2 लीटर पेट्रोल नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे. कारच्या पॉवर आउटपुटबद्दल बोलायचे झाले तर ते 60 Bhp पर्यंत जनरेट करते.

Maruti Suzuki Wagon R किंमत

वॅगन आर केवळ कमी मेंटेनेंस आणि चांगल्या मायलेजसाठी प्रसिद्ध नाही, तर ही कार अतिशय वाजवी दरातही उपलब्ध आहे. तुम्ही ही कार 5.54 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता. तर त्याचा टॉप व्हेरिएंट 6.45 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.