Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki WAGONR : 5 लाख किंमत असलेली मारुतीची सुपर कार शून्य रुपयांमध्ये आणा घरी! देते 35 Kmpl मायलेज

कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची चांगली संधी आहे. कारण मारुती सुझुकीकडून त्यांच्या कारवर EMI पर्याय देण्यात आला आहे. 35 Kmpl मायलेज देणारी कार शून्य रुपयांमध्ये घरी आणू शकता.

0

Maruti Suzuki WAGONR : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो कार दरमहा विकल्या जात आहेत.

दिवाळीमध्ये कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची चांगली संधी आहे. कारण मारुती सुझुकीच्या स्टायलिश कार Wagonr तुम्ही आता शून्य रुपयांमध्ये घरी आणू शकता. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकीच्या वॅगन आर कारने टॉप १० कारच्या सर्वाधिक विक्रीमध्ये स्थान मिळवले आहे. गेल्या महिन्यात या कारची 22,080 युनिट्सची विक्री झाली आहे. तर स्विफ्ट कारची 20,598 युनिट्सची विक्री झाली आहे.

वॅगन आर शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगन आर कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल आणि सियानजीमध्ये ही कार ऑफर केली गेली आहे. कारमध्ये 1.0 लीटर आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. ही कार पेट्रोल व्हर्जनवर 27 Kmpl अँयलेज देण्यास सक्षम आहे. तर सीएनजीमध्ये ही कार 35 Kmpl अँयलेज देण्यास सक्षम आहे.

वॅगन आरमध्ये सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी वॅगन आर कारमध्ये सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये दोन एअरबॅग, ABS, EBD, इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, स्टीयरिंग लॉक, चाइल्ड सिक्युरिटी लॉक, रिअर पार्किंग सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, इंजिन इमोबिलायझर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

वॅगन आर EMI पर्याय

मारुती सुझुकी वॅगन आर कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि वॅगन आर कार खरेदी करायची असेल तर तुम्ही शून्य रुपयांमध्ये ही कार खरेदी करू शकता.

मारुती वॅगन आर कारवर EMI पर्याय देण्यात आला आहे. कारचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी 6,09,984 लाख रुपयांची गरज आहे. मात्र तुम्ही ७ वर्षांच्या EMI वर तुम्ही कार घरी आणू शकता. हे कर्ज ९ टक्के व्याजदराने दिले जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा ९,८१४ रुपये भरावे लागेल. ७ वर्षांमध्ये तुम्हाला 2,14,399 रुपये व्याज भरावे लागेल.