Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

34 किमी मायलेज देणाऱ्या ‘या’ शानदार कारवर बंपर सूट! होणार 49 हजारांची बचत; जाणून घ्या ‘ही’ अप्रतिम ऑफर । Maruti Suzuki WagonR

हे जाणून घ्या कि ही कार सध्या बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कारबद्दल सविस्तर माहिती.

0

Maruti Suzuki WagonR :  जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करणार असाल तर आम्ही आज तुम्हाला एका मस्त कारची माहिती देणार आहोत. ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी तब्बल 49 हजारांची बचत करून रस्त्यांवर 34 किमी मायलेज देणारी कार घरी आणू शकतात. हे जाणून घ्या कि ही कार सध्या बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट कारबद्दल सविस्तर माहिती.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि आम्ही  येथे तुम्हाला लोकप्रिय ऑटो कंपनी मारुती सुझुकीच्या Maruti Suzuki WagonR CNG बद्दल माहिती देत आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता 49 हजारांची बचत करून नवीन कार घरी आणू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्ही या ऑफरचा लाभ फक्त 31 जुलै 2023 पर्यंत घेऊ शकतात. चला जाणून घेऊया या मस्त ऑफरबद्दल सविस्तर माहिती.

Maruti Suzuki WagonR ऑफर

रोख आणि कॉर्पोरेट सूट व्यतिरिक्त एक्सचेंज बोनस

मारुती सुझुकी जुलै 2023 मध्ये WagonR वर सवलत ऑफर देत आहे. या सवलती रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटच्या स्वरूपात दिल्या जात आहेत. या ऑफर 31 जुलै 2023 पर्यंत वैध आहेत. याचा अर्थ जे लोक 31 जुलैपूर्वी कार खरेदी करतात ते या कार स्वस्तात खरेदी करू शकतात.

जुलै 2023 मध्ये WagonR वर सूट

जुलै 2023 मध्ये, WagonR वर 49,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. त्याच्या मॅन्युअल आणि सीएनजी व्हेरियंटवर 25,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

AMT व्हेरियंटवर किती सूट?

दुसरीकडे AMT व्हेरियंटमध्ये रु. 15,000 पर्यंत रोख सवलत, रु. 20,000 चे एक्सचेंज बोनस आणि रु. 4,000 कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. मात्र हे लक्षात घ्या; डीलरशिप, स्थान, व्हेरियंट आणि रंग यावर अवलंबून या सवलती भिन्न असू शकतात.

Maruti Suzuki WagonR  इंजिन पॉवरट्रेन

वॅगनआर LXi, VXi, ZXi आणि ZXi Plus या चार व्हेरियंटमध्ये  उपलब्ध आहे. यात 1.0-लीटर आणि 1.2-लीटर पेट्रोल पेट्रोल इंजिन पर्याय देखील मिळतात. दुसरीकडे, त्याच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे 1.0-लिटर इंजिन 66bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Maruti Suzuki WagonR CNG इंजिन

त्यात सीएनजीचाही पर्याय आहे. त्याच्यासोबत उपलब्ध असलेले 1.2-लिटर इंजिन 89bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि एजीएस युनिट्सशी जोडलेले आहेत.