Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Suzuki WagonR : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 5 लाखात घरी आणा मारुतीची मायलेज किंग कार! मिळतेय 49 हजारांची सूट

तुम्हीही दररोजच्या प्रवासासाठी बाईकचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण बाईकच्या मायलेजमध्ये तुम्ही दररोज कारने प्रवास करू शकता. मारुतीची मायलेज किंग कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

0

Maruti Suzuki WagonR : देशात सध्या सणासुदीच्या काळ सुरु आहे. अशा काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. तुम्हालाही उत्तम मायलेज देणारी कमी बजेट ५ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मारूतीची हॅचबॅक कार उपलब्ध आहे.

मारुती सुझुकी त्यांच्या अनेक कारवर या महिन्यात बंपर ऑफर देत आहे. तुम्ही देखील मारुती सुझुकीची वॅगनआर कार खरेदी करून ४९ हजार रुपयांची बचत करू शकता. मारुती सुझुकीची वॅगनआर कार दररोजच्या प्रवासासाठी उत्तम हॅचबॅक कार आहे.

ऑक्टोबर २०२३ या महिन्यात मारुतीची वॅगनआर कार सर्वाधिक विक्री झालेली नंबर वन कार ठरली आहे. वॅगनआर कारसोबतच कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर दिवाळीनिमित्त मोठी ऑफर देण्यात येत आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर ऑफर

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगनआर हॅचबॅक कारवर नोव्हेंबर २०२३ मध्ये ४९ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यामध्ये 25,000 रुपयांपर्यंत रोख सूट, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे. त्यामुळे या महिन्यात वॅगनआर कार खरेदी करून तुम्ही हजारोंची बचत करू शकता.

वॅगनआरची ऑक्टोबर २०२३ मध्ये विक्री

मारुती सुझुकी वॅगनआर कारमध्ये जबरदस्त फीचर्स अगदी कमी किमतीत दिले जात असल्याने ग्राहकांचा या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२३ या महिन्यात वॅगनआर कारची एकूण 22 हजार 80 युनिटची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 17 हजार 945 युनिट्सची विक्री झाली होती. कारच्या विक्रीमध्ये वार्षिक २३ टक्के वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगनआर हॅचबॅक कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. वॅगनआर कारचे मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंट 24.35 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर ऑटोमॅटिक व्हेरियंट 25.19 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

तसेच वॅगनआर कारमध्ये आणखी एक इंजिन पर्याय देण्यात आला आहे. कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. याचे मॅन्युअल व्हेरियंट 23.56 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट 24.43 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारचे सीएनजी व्हेरियंट 34.05 Kmpl मायलेज देते.

मारुती सुझुकी वॅगनआर किंमत

तुम्हालाही स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी हॅचबॅक कार खरेदी करायची असेल तर वॅगनआर उत्तम पर्याय आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5 लाख 54 हजार आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7 लाख 30 हजार आहे.