Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift 2024 : मारुतीच्या नवीन स्विफ्टला मिळणार शक्तिशाली इंजिन, होणार हे मोठे बदल

मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट कार पहिल्या कारपेक्षा अधिक शक्तिशाली असणार आहे. कारण कारला आता नवीन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

0

Maruti Swift 2024 : मारुती सुझुकीची लोकप्रिय स्विफ्ट सेडान कार लवकरच नवीन रूपात पाहायला मिळणार आहे. मारुती सुझुकीच्या अनेक कार २०२४ मध्ये लाँच केल्या जाणार आहेत. नवीन स्विफ्ट कारला आणखी एक इंजिन पर्याय दिला जाणार आहे.

तुम्ही यावर्षी स्विफ्ट आर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी २०२४ मध्ये त्यांची नवीन स्विफ्ट कार मोठ्या बदलांसह सादर करणार आहे. तसेच कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय दिला जाण्याची शक्यता असल्याने कारच्या मायलेजमध्ये देखील मोठी वाढ होऊ शकते.

जपानमधील ऑटो शोमध्ये मारुतीने त्यांची न्यू जनरेशन स्विफ्ट कार सादर केली आहे. या कारमध्ये डिझाईनपासून नवीन फीचर्स मिलाळायचे दिसत आहे. तसेच भारतीय रस्त्यावर ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

2024 मारुती सुझुकी स्विफ्ट डिझाइन

मारुती सुझुकीची नवीन स्विफ्ट चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारचा लूक आणखी स्पोर्टी करण्यासाठी डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. कारला हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. टेलगेट आणि लाईट क्लस्टरसह स्विफ्टच्या मागील बाजूस अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच कारला नवीन बंपर देखील देण्यात आला आहे.

2024 मारुती सुझुकी स्विफ्ट डायमेंशन

नवीन स्विफ्ट कारमध्ये अनेक बदल केले आहेत. नवीन स्विफ्ट कारची लांबी 3,860 मिमी, रुंदी 1,695 मिमी आणि उंची 1,500 मिमी देण्यात आली आहे. पूर्वीपेक्षा ही कार मोठी असणार आहे. कारला 2,540 मिमी चा व्हीलबेस देण्यात येत आहे.

2024 मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन इंजिन

स्विफ्ट कारच्या न्यू जनरेशन मॉडेलमध्ये 1.2-लीटर तीन-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन दिले जाईल. सध्या 1.2-लिटर 4 सिलेंडर इंजिन कारमध्ये देण्यात येत आहे जे 89 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच कारला हायब्रीड इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. मारुतीने कारच्या इंजिनबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. लवकरच कंपनीकडून कारच्या किमती आणि इंजिनबाबत माहिती उघड केली जाईल.