Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift Facelift 2024 : मारुती स्विफ्ट फेसलिफ्ट 2024 मध्ये होणार लॉन्च! नवीन इंजिनसह होणार हे मोठे बदल

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय सेडान कार स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये नवीन इंजिन पर्याय दिला जाणार आहे.

0

Maruti Swift Facelift 2024 : मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक स्वस्त कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता मारुतीकडून आणखी नवीन कार सादर केल्या जाणार आहेत.

मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून त्यांच्या लाखो कार दरमहिन्याला विकल्या जातात. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वाधिक लोकप्रिय सेडान कार आहे. आता मारुतीकडून स्विफ्ट कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे.

मारुती सुझुकीकडून जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये त्यांची नवीन स्विफ्ट कारचे अनावरण केले आहे. या कारमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. लवकरच ही कार नवीन बदलांसह भारतात सादर केली जाऊ शकते.

स्विफ्ट कारचा स्पोर्टी लूक वाढवण्यासाठी कंपनीकडून डिझाईनमध्ये बदल केला आहे. तसेच नवीन स्विफ्ट कारमध्ये नवीन इंजिन पर्याय दिला जाणार आहे. त्यामुळे कारचे मायलेज देखील वाढणार आहे. पुढच्या वर्षी 2024 मध्ये नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कार ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाईल.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट सेडान कारमध्ये नवीन इन्फोमेंट सिस्टम, लेव्हल 2 ADAS, एलईडी हेडलॅम्प आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. परिपूर्ण फीचर्ससह ही कार भारतात सादर केली जाणार आहे.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला मिळणार नवीन इंजिन

नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारमध्ये कंपनीकडून नवीन 1.2L तीन-सिलेंडर NA Z12E पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन कारचे मायलेज वाढवण्यास सक्षम असेल. हे इंजिन सौम्य संकरित प्रणालीसह समाविष्ट असेल. सौम्य हायब्रिड तंत्रज्ञान MZ आणि MX व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिले जाईल.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट कारच्या फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. तसेच कारचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीयरिंग व्हील, बटणे आणि टच सरफेस तसेच सेंटर कन्सोल कायम ठेवले जातील.

इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी नवीन डॅशबोर्ड, एसी कन्सोल आणि 10-इंचाचा डिस्प्ले कारमध्ये दिला जाईल. स्विफ्ट कार लाँच होताच Hyundai Grand i10 Nios, Renault Triber, Citroen C3, Tata Punch आणि Hyundai Exter कारशी स्पर्धा करेल.

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला मिळणार 13 रंग पर्याय

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टला 13 रंग पर्याय मिळणार आहेत. यामध्ये 9 सिंगल-टोन आणि 4 ड्युअल टोन रंग पर्यायांचा समावेश असणार आहे. कारमध्ये मोनो-टोन शेड्स फ्रंटियर ब्लू पर्ल मेटॅलिक, कूल यलो मेटॅलिक, बर्निंग रेड पर्ल मेटॅलिक, सुपर ब्लॅक पर्ल, स्टार सिल्व्हर मेटॅलिक, फ्लेम ऑरेंज पर्ल मेटॅलिक, कॅरव्हान आयव्हरी पर्ल मेटॅलिक, प्युअर व्हाईट पर्ल आणि प्रीमियम सिल्व्हर मेटॅलिक असे रंग पर्याय दिले जातील.