Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift Facelift 2024 : ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी स्विफ्ट अवतरली नवीन रूपात! लवकरच होणार लॉन्च, शक्तिशाली इंजिनसह होणार मोठे बदल

मारुती सुझुकीकडून त्यांची लोकप्रिय सेडान कार स्विफ्ट आता लवकरच नवीन रूपात लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये नवीन शक्तिशाली इंजिन पाहायला मिळू शकते.

0

Maruti Swift Facelift 2024 : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या स्विफ्ट सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही कार देशातील नंबर वन सेडान कार बनली आहे. आता कंपनीकडून स्विफ्ट कारचे नवीन मॉडेल बाजारात लॉन्च केले जाणार आहे.

26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीमध्ये मारुतीकडून टोकियो मोटर शोमध्ये आपली नवीन स्विफ्ट सादर केली जाऊ शकते. पहिल्या स्विफ्ट कारपेक्षा नवीन स्विफ्ट कार आणखी स्टायलिश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्विफ्ट कारचा लूक आणि फीचर्स आणखी जबरदस्त असतील. ग्राहकांना आक्षरहित करण्यासाठी कारचा लूक आणि आकर्षक बनवण्यात आला आहे. कारला स्पोर्टियर टच देण्यात येणार आहे. स्विफ्ट कारच्या फ्रंट एंडलाही नव्याने डिझाइन करण्यात आले आहे. सुझुकीच्या लोगो आणि फ्रंट ग्रिलमध्ये बदल होऊ शकतो.

बंपर पूर्णपणे रीडिझाइन करण्यात आला आहे

मारुती सुझुकीकडून त्यांच्या स्विफ्ट सेडान कारमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. कारच्या बंपरला पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आले आहे. टेल लॅम्पच्या वर एक अक्षर रेखा देखील कंपनीकडून देण्यात आली आहे. कारमध्ये नवीन अलॉय व्हील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

यात 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये उत्तम डिझाइन दिले जाणार आहे. कारमध्ये फोर्ड फोकस आणि विटारा ब्रेझा मधील स्विचगियर दिले जाऊ शकते. कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग व्हील आणि HVAC नियंत्रणासाठी टॉगल स्विच देण्यात येऊ शकतो.

पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरियंट मध्ये लाँच होणार

मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंट दिले जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये एक नवीन शक्तिशाली इंजिन पाहायला मिळू शकते. सध्या स्विफ्ट कारमध्ये 1.2-लिटर, चार-सिलेंडर इंजिन देण्यात येत आहे जे 90 bhp आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे.