Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift : मारुतीच्या या सेडान कारला तोडच नाही! 6 लाखांपेक्षा कमी किमतीत 30 Kmpl मायलेज आणि मिळतात जबरदस्त फीचर्स

मारुती सुझुकीच्या कारला मध्यमवर्गीय ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. कारण मारुतीकडून नेहमी कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर केल्या जात आहेत.

0

Maruti Swift : मारुती सुझुकीच्या कार यावर्षी देखील सर्वाधिक विक्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. तसेच मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. भारतीय ऑटो मार्केटमध्ये मारुतीकडून अनेक हॅचबॅक कार सादर करण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या हॅचबॅक कार स्विफ्टला बाजारात टक्कर देणारी कार आजही आलेली नाही. त्यामुळे या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती स्विफ्ट ही जुलै २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी देशातील नंबर वन सेडान कार ठरली आहे.

मारुतीकडून स्विफ्ट कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आले आहेत. या कारला स्पोर्ट्स लुक देण्यात आला आहे. आता लवकरच मारुतीकडून स्विफ्ट कारचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे.

स्वयंचलित ट्रांसमिशन पर्याय

मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 90 पीएस पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मारुतीची स्विफ्ट ही एक ५ सीटर कार आहे. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात येत आहेत.

CNG मध्ये जास्त मायलेज

मारुती सुझुकी स्विफ्ट कार 1.2-लीटर मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 22.38 kmpl मायलेज देते. 1.2-लिटर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ही कार 22.56 kmpl चा मायलेज देते. तर सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशन 30.90 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती स्विफ्ट किंमत

मारुती सुझुकी स्विफ्ट कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.03 लाख रुपये आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये स्विफ्ट कारचे इंजिन 77.5 PS चा पॉवर आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करते.

268 लीटर बूट स्पेस

मारुती स्विफ्ट सेडान कारमध्ये ड्युअल एअरबॅग आणि 268 लीटर बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच कारमध्ये १० रंग पर्याय उपलब्ध आहेत. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ असे एकूण चार मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. स्विफ्ट कार 7-इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येते.

ऑटो एसी आणि एलईडी डीआरएल

मारुती सुझुकी स्विफ्ट सेडान कारमध्ये उंची कमी जास्त करता येण्याजोगे ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि EBD सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये ऑटो एसी आणि एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, एबीएस आणि हिल-होल्ड कंट्रोल देण्यात आले आहेत.