Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Swift Sedan : 31 Kmpl मायलेज आणि किंमत 6 लाख, मारुतीची ही स्टायलिश कार खरेदीसाठी ग्राहकांनी केली गर्दी…

मारुती सुझुकीच्या कार सर्वाधिक विक्रीमध्ये ऑगस्ट महिन्यात देखील अव्वल स्थानी आहेत. मारुतीच्या सेडान कारने इतर सेडान कारला मागे टाकत सर्वाधिक विक्री केली आहे.

0

Maruti Swift Sedan : देशातील सर्व ऑटो कंपन्यांनी त्यांच्या ऑगस्ट महिन्यातील कार विक्रीचे अहवाल सादर केले आहेत. ऑगस्ट २०२३ या महिन्यात देखील मारुती सुझुकीच्या कारचा दबदबा कायम आहे. मारुती सुझुकीने या महिन्यात देखील सर्वाधिक कार विक्री करत पहिले स्थान कायम ठेवले आहे.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो कार दरवर्षी विकल्या जात आहेत. तसेच सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीलाच ओळखले जाते.

मारुती सुझुकी नेहमी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किमतीत शानदार फीचर्स कार सादर करत आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांना मारुतीच्या कार सर्वाधिक पसंतीस येत आहेत. मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यात देखील सर्वाधिक कार विक्री केल्या आहेत.

मारुती सुझुकी स्विफ्ट सेडान ठरली नंबर वन कार

मारुती सुझुकी स्विफ्ट कार सेडान कारच्या विक्रीमध्ये नंबर वन ठरली आहे. ऑगस्ट २०२३ महिन्यामध्ये कारची एकूण 18,653 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी या कारची ऑगस्ट २०२२ मध्ये ११,२७५ युनिट्सची विक्री झाली होती. कारच्या विक्रीमध्ये यावर्षी तब्बल 65% वाढ झाली आहे.

मारुती स्विफ्ट इंजिन आणि मायलेज

मारुती सुझुकी स्विफ्ट कारमध्ये 1197cc Advanced K Series Dual Jet, Dual VVT पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे हे इंजिन 66kW पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरते करते. कारचे पेट्रोल इंजिन (MT) 22.38km मायलेज देते तर त्याचे AGS मॉडेल 22.56km मायलेज देते.

मारुती स्विफ्टचे सीएनजी मॉडेल 31km/kg मायलेज देण्यास सक्षम आहे. स्विफ्ट कारची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये EBD आणि EPS सोबत एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम अशी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

मात्र सुरक्षा चाचणीमध्ये या कारला फारसे चांगले गुण मिळवता आले नाहीत. मात्र मारुती सुझुकी स्विफ्ट कार सेडान कारच्या विक्रीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. कारची किंमत देखील कमी आहे आणि जबरदस्त मायलेज देत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.