Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Under 10 Lakh CNG Cars : पेट्रोल-डिझेलला करा रामराम! घरी आणा मारुतीच्या या 4 स्वस्त CNG कार, देतात 35 Kmpl मायलेज

तुम्हालाही दररोज प्रवास करण्यासाठी इंधनावर अधिक पैसे पैसे खर्च करावे लागत असतील टेन्शन घेऊ नका. कारण अगदी कमी बजेटमध्ये 35 Kmpl मायलेज देणाऱ्या सीएनजी कार खरेदी करू शकता.

0

Maruti Under 10 Lakh CNG Cars : देशात इंधनाचे दर खूपच वाढल्याने अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सीएनजी सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची मजबूत पकड असल्याचे दिसत आहे. मारुतीकडून त्याच्या अनेक सीएनजी कार ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत.

त्यामुळे तुम्हालाही इंधनावर जास्त पैसे खर्च कराचे नसतील तर तुम्ही मारुतीच्या स्वस्त सीएनजी कार खरेदी करून पैशांची बचत करू शकता. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार निर्मिती करणारी आणि विक्री करणारी मोठी कंपनी आहे.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या WagonR, Alto 800, Celerio, Ertiga, Eeco, Dezire, Swift या कारमध्ये सीएनजी पर्याय दिला आहे. या कार मायलेजच्या बाबतीत देखील शानदार आहेत. तसेच किंमत देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगन आर कारमध्ये देखील कंपनी फिटेड सीएनजी किट देण्यात आले आहे. कारमध्ये 1.0 लीटर आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.45 लाख रुपये ते 6.90 लाख रुपये आहे.

कारमध्ये हिल होल्ड असिस्ट (स्टँडर्ड), ड्युअल एअरबॅग्ज (स्टँडर्ड), मागील पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक आणि चाइल्ड प्रूफ रिअर डोअर लॉक, सेंट्रल लॉकिंग सिस्टम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही कार पेट्रोल व्हर्जनमध्ये 25.19 kmpl आणि सीएनजी व्हर्जनमध्ये 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी अल्टो 800

मारुती सुझुकीकडून त्यांच्या अल्टो 800 या एकेकाळी लोकप्रिय असलेल्या कारमध्ये देखील सीएनजी किट पर्याय दिला आहे. कारमध्ये 0.8-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 41 पीएस पॉवर आणि 60 एनएम टॉर्क जनरेट करते. कार सीएनजी व्हेरियंटमध्ये 31.59 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

कारच्या सीएनजी सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.13 लाख रुपये आहे. कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, कीलेस एंट्री, फ्रंट पॉवर विंडो, ड्रायव्हर साइड एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर्स, EBD सह ABS असे फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी डिझायर सीएनजी

मारुती सुझुकीची डिझायर ही एक लोकप्रिय सेडान कार आहे. कारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 1.2 लीटर K12C ड्युअल जेट इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 76 bhp आणि 98.5 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारमध्ये 7-इंच स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, स्टीयरिंग व्हील, रिअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल ORVM, 10 स्पोक 15-इंच अलॉय व्हील अशी उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत.

कारच्या सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 8.32 लाख रुपये आहे. सीएनजीमध्ये ही कार 31.12 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. डिझायर कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी सेलेरियो ही हॅचबॅक कार देखील तुमच्यासाठी उत्तम सीएनजी कार आहे. सेलेरियो कार सीएनजीमध्ये 35.60 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये हिल होल्ड असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, क्रोम अॅक्सेंटसह ट्विन-स्लॉट एसी व्हेंट, नवीन गियर शिफ्ट डिझाइन देण्यात आले आहे. कारच्या सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.74 लाख रुपये आहे.