Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Upcoming Cars : मारुतीने कसली कंबर ! लॉन्च करणार 5 स्टायलिश कार्स, इथे पहा यादी…

0

Maruti Upcoming Cars : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. मारुतीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता मारुती सुझुकी त्यांच्या आणखी 5 स्टायलिश कार्स भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.

मारुती सुझुकीच्या लाखो कार दरवर्षी भारतीय ऑटो मार्केटमध्ये विकली जात आहेत. तसेच मारुती सुझुकीच्या कारच्या मागणीत देखील प्रचंड वाढ झाली आहे. ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी मारुतीकडून आणखी नवीन कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

1. मारुती सुझुकी Y43 मायक्रो SUV

मारुती सुझुकीकडून टाटा पंच आणि ह्युंदाई Exter एसयूव्ही कारला टक्कर देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मारुतीकडून लवकरच त्यांची Y43 मायक्रो SUV कार लॉन्च केली जाणार आहे.

मारुतीची नवीन एसयूव्ही कार Brezza आणि Fronx च्या खाली असेल. 2026 मध्ये ही कार सादर केली जाण्याची शक्यता आहे. मारुतीची मायक्रो एसयूव्ही कार 1.2L Z सीरीज पेट्रोल इंजिनसह सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह सुसज्ज असेल.

2. मारुती सुझुकी YDB कॉम्पॅक्ट MPV

मारुती सुझुकीकडून रेनॉल्ट ट्रायबरला टक्कर देण्यासाठी देखील नवीन YDB एसयूव्ही कार लाँच केली जाणार आहे. कारमध्ये 1.2L Z सिरीज इंजिन पर्याय
दिला जाऊ शकतो. कारमध्ये 7 सीटर पर्याय देखील दिला जाणार आहे.

3. नवीन-जनरल मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर

मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय कार स्विफ्ट आणि डिझायरचे नवीन जनरेशन मॉडेल भारतात लाँच केले जाणार आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. 1.2L Z सौम्य-हायब्रिड पेट्रोल इंजिन कारमध्ये दिले जाऊ शकते.

4. मारुती सुझुकी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक हॅचबॅक

मारुती सुझुकीकडून अद्याप त्यांची एकही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करण्यात आलेली नाही. मात्र आता मारुती सुझुकी यावर्षी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार EVX लाँच केली जाणार आहे.

नवीन प्लॅटफॉर्मवर ही कार सादर केली जाणार आहे. ही कार Tata Tiago EV, Citroen eC3 आणि MG Comet EV सारख्या कारशी स्पर्धा करेल.