Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Wagon R : फक्त 1 लाखांत घरी आणा मारुतीची लोकप्रिय वॅगन आर, दरमहा भरावे लागतील इतके पैसे

तुमचेही कार खरेदी करण्यासाठी बजेट कमी असेल तर काळजी करू नका. मारुती सुझुकी वॅगन आर कार अवघ्या १ लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता.

0

Maruti Wagon R : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या शानदार फीचर्स हॅचबॅक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या आहेत. या हॅचबॅक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही मारुतीची उत्तम हॅचबॅक कार अवघ्या १ लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता.

मारुती सुझुकीची वॅगन आर कार ५ सीटर सेगमेंटमध्ये उत्तम हॅचबॅक कार आहे. या कारची ऑक्टोबर २०२३ या महिन्यात टॉप १० कारच्या विक्रीमध्ये स्थान मिळवले आहे. वॅगन आर कार खरेदी करण्यासाठी तुमचेही कमी बजेट असेल तर काळजी करू नका. अवघ्या १० लाख रुपयांमध्ये तुम्ही Wagon R कार खरेदी करू शकता.

मारुती वॅगन आर किंमत

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची वॅगन आर कार कमी बजेट ग्राहकांसाठी एक उत्तम ५ सीटर कार आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. या कारने स्विफ्ट आणि बलेनो तसेच टाटा Nexon, पंच, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि ह्युंदाई क्रेटा कारला मागे टाकत वॅगन आर कार नंबर वन कार ठरली आहे.

वॅगन आर कारच्या ZXI Plus MT आणि ZXI AT या दोन व्हेरियंटला प्रचंड मागणी आहे. ZXI Plus MT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 6.75 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.83 लाख रुपये आहे. कारमध्ये 1197 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88.5 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम असेल. ही कार 23.56 ते 24.43 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती WagonR EMI प्लॅन

मारिती सुझुकीकडून त्यांच्या WagonR कारवर EMI पर्याय देण्यात आला आहे. कारची ऑन-रोड किंमत 7,64,043 रुपये आहे. तुम्ही ही कार 1 लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह खरेदी करू शकता.

बाकी बँकेकडून पैसे तुम्ही कर्जाच्या स्वरूपात घेऊ शकता. १ लाख रुपयांचे डाउनपेमेंट भरल्यानंतर तुमहाला 6,64,043 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधी पर्यंत दिले जाईल.

या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक 9 टक्के व्याज आकारले जाईल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा 13,784 रुपये EMI भरावा लागेल. ५ वर्षात तुमच्याकडून कर्जावर 1.63 लाखापेक्षा जास्त व्याज आकारले जाईल.