Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Wagon R EMI Plan : 5 लाखांची Wagon R घरी आणा अवघ्या 65 हजारांत, इथं पहा कसं ते

0

Maruti Wagon R EMI Plan : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या स्वस्त कार सादर केल्या आहेत. मात्र या कार खरेदी करण्यासाठी अनेकांचे बजेट कमी असते. तुमचेही Wagon R खरेदीसाठी बजेट कमी पडत असेल तर काळजी करू नका.

कारण आता मारुती सुझुकी Wagon R कारवर कंपनीकडून फायनान्स प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे 5 लाखांची Wagon R तुम्ही अवघ्या 65 हजारांत घरी आणू शकता. कमी बजेट ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

मारुती सुझुकी Wagon R देशातील नंबर वन प्रीमियम हॅचबॅक कार ठरली आहे. या कारची नोव्हेंबर 2023 या महिन्यात 16,567 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 या महिन्यात Wagon R ची 14,720 युनिट्स विकली गेली होती.

मारुती वॅगन आर किंमत आणि इंजिन

मारुती सुझुकी वॅगन आर हॅचबॅक कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.54 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.42 लाख रुपये आहे.

कारमध्ये 1 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देखील दिले आहे जे 90 PS पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय ऑफर करण्यात येत आहे, कारचे सीएनजी मॉडेल 34.05 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती वॅगन आर फीचर्स

मारुती सुझुकी वॅगन आर कारची किंमत जरी कमी असली तरी कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 4-स्पीकर म्युझिक सिस्टीम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ आणि फोन कंट्रोल्स, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, 14-इंच अलॉय व्हील आणि मागील पार्किंग सेन्सर्स, 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर स्टीयरिंग, अॅडजस्टेबल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

मारुती वॅगन आर EMI प्लॅन

मारुती सुझुकी वॅगन आर कार खरेदी करण्यासाठी तुमचेही बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही 65 हजारांचे डाऊनपेमेंट भरून ही कार घरी आणू शकता. कारच्या बेस मॉडेल LXI पेट्रोल व्हेरियंटची ऑन रोड किंमत 6.48 लाख रुपये आहे.

तुम्ही 65 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट भरल्यानंतर बँकेकडून तुम्हाला 5.83 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. हे कार कर्ज तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधी दिले जाईल.

कर्जावर वार्षिक 9.8 टक्के व्याजदर आकारला जाईल. 5 वर्षात दरमहा तुम्हाला 12,344 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कर्जावर तुम्हाला 1,56,983 रुपये जास्त भरावे लागतील.