Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti Wagon R : सणासुदीच्या काळात घरी आणा मारुतीची ‘ही’ हॅचबॅक कार, शानदार फीचरसह मिळेल 341 लीटर बूट स्पेस

जर तुम्ही हॅचबॅक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. तुम्ही मारुतीची लोकप्रिय कार स्वस्तात खरेदी करू शकता.

0

Maruti Wagon R : सणासुदीच्या काळात अनेकजण शानदार फीचर्स असणाऱ्या कार खरेदी करतात. जर तुम्हीही कार खरेदीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता Maruti Wagon R ही हॅचबॅक कार खरेदी करू शकता. यात शानदार फीचरसह 341 लीटर बूट स्पेस मिळेल.

CNG पर्याय

किमतीचा विचार केला तर भारतीय बाजारात मारुती वॅगन आरची सुरुवातीची किंमत 5.55 लाख रुपये एक्स-शोरूम असून कारचे टॉप मॉडेल 7.43 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi या चार प्रकारांमध्ये येत असून या कारचे LXi आणि VXi प्रकार CNG पर्याय उपलब्ध आहे.

मिळेल 341 लिटर बूट स्पेस

कंपनीच्या या शक्तिशाली कारमध्ये तुम्हाला दोन ड्युअल टोन कलर आणि सहा मोनोटोन कलर पर्याय पाहायला मिळतील. यात 341 लीटरची मोठी बूट स्पेस दिली आहे. शक्तिशाली 1-लिटर पेट्रोल इंजिन मिळत असून ते ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

ऑटोमॅटिक ट्रान्समिशन

मारुतीच्या या कारमध्ये 1.2-लीटर इंजिन पर्याय देण्यात आला आहे. जे 90 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या या कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.

कोणाशी करेल स्पर्धा

कंपनीच्या या कारचे 1.2-लीटर पेट्रोल ऑटोमॅटिक इंजिन 25.19 kmpl मायलेज देईल. तसेच यात 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम आणि स्टीयरिंग-माउंट ऑडिओ दिले आहे.

सुरक्षेसाठी, कारमध्ये EBD सह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर आणि हिल-होल्ड असिस्ट (केवळ AMT प्रकारात) देण्यात येते. मारुतीची ही कार बाजारात टाटा टियागो, मारुती सेलेरियो आणि सिट्रोएन सी3 यांना टक्कर देते. इतकेच नाही तर आता कंपनी मारुती वॅगन आरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवरही काम करत आहे.