Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti WagonR वर भन्नाट ऑफर! आता 1 लाखांमध्ये आणा घरी; जाणून घ्या कुठे मिळतेय संधी?

Maruti WagonR CNG अवघ्या  1 लाखांमध्ये खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात Maruti WagonR भन्नाट फीचर्स आणि जबरदस्त मायलेजमुळे धुमाकूळ घालत आहे.

0

Maruti WagonR : जर तुम्ही तुमच्यासाठी स्वस्तात मस्त सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या भारतीय ऑटो बाजारात एक मस्त आणि बेस्ट ऑफर जाहीर करण्यात आला आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत लोकप्रिय कार  Maruti WagonR CNG अवघ्या  1 लाखांमध्ये खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात Maruti WagonR भन्नाट फीचर्स आणि जबरदस्त मायलेजमुळे धुमाकूळ घालत आहे. या कारसाठी दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. यामुळे जर तुम्ही ही कार खरेदीचा विचार करत असाल तर या संधीचा फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये ही कार घरी आणू शकतात. आज बाजारात या कारची किंमत 6.89 लाख रुपये आहे. मात्र जर तुमच्यकडे इतका बजेट उपलब्ध नसेल तर तुम्ही Maruti WagonR CNG चे सेकंड हॅन्ड मॉडेल देखील घरी आणू शकतात.

या लेखात आम्ही तुम्हाला या कारच्या सेकंड हँड मॉडेल्सवरील ऑफर्सची माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता ही कार अवघ्या 1 लाखात खरेदी करू शकतात.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि सेकंड हँड मारुती वॅगनआर सीएनजीवरील या ऑफर विविध ऑनलाइन वेबसाइट्सवरून घेण्यात आल्या आहेत.

Maruti WagonR CNG ऑफर्स

Maruti WagonR CNG  सेकंड हँडसाठी पहिला ऑफर OLX वेबसाइटवर लिस्टिंग करण्यात आला आहे. या वेबसाइटवर तुम्हाला WagonR चे 2010 मॉडेल खरेदी करता येणार आहे. याच बरोबर ही कार खरेदीसाठी तुम्हाला 1 लाख रुपये मोजावे लागणार आहे मात्र हे जाणून घ्या कि ही कार खरेदी करण्यासाठी विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Maruti WagonR  CNG  किटच्या सेकंड हँड मॉडेलसाठी दुसरा ऑफर QUIKR वेबसाइटवर लिस्टिंग करण्यात आला आहे. या वेबसाइटवर तुम्हाला WagonR चे  2011 मॉडेल खरेदी करता येणार आहे. या कारची किंमत 1.8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे मात्र हे जाणून घ्या कि ही कार खरेदी करण्यासाठी विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Maruti WagonR  CNG  किटच्या सेकंड हँड मॉडेलसाठी तिसरा ऑफर CARTRADE वेबसाइटवर उपलब्ध आहे.या वेबसाइटवर तुम्हाला WagonR चे   2014 मॉडेल खरेदी करता येणार आहे.या कारसाठी विक्रेत्याने तीन लाख रुपये किंमत ठेवली आहे. ही कार खरेदी केल्यावर, ग्राहकाला सुलभ डाउन पेमेंटसह वित्त योजना देखील मिळेल.

तज्ञांचा सल्ला

सीएनजी किटसह मारुती वॅगनआरवरील या ऑफर्स वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या बजेट आणि आवडीनुसार कोणताही पर्याय खरेदी करू शकता. पण कोणत्याही कारचा ऑनलाईन व्यवहार करण्यापूर्वी त्या ठिकाणाला भेट देऊन तिची खरी स्थिती पाहणे आवश्यक आहे. असे न केल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.