Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Maruti WagonR EMI Plan : अवघ्या 68 हजारांत घरी आणा 34 Kmpl मायलेज देणारी प्रीमियम हॅचबॅक WagonR, पहा कसे ते

0

Maruti WagonR EMI Plan : देशात महागाई वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये कारच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे कमी बजेट ग्राहकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता कमी बजेट ग्राहकांना अगदी सहज कार खरेदी करता येईल.

तुम्हालाही दमदार मायलेज देणारी प्रीमियम हॅचबॅक कार WagonR कमी बजेटमध्ये खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी कारवर फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. WagonR सीएनजी कार तुम्ही 68 हजार रुपयांमध्ये घरी आणू शकता.

मारुती सुझुकीची WagonR कार देशातील टॉप 10 कार विक्रीमध्ये नंबर वन कार ठरली आहे. WagonR हॅचबॅक कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वॅगन आर कारचे LXI CNG व्हेरियंट तुम्ही 68 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने WagonR कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय दिला आहे. कारची दोन्ही व्हेरियंट दमदार मायलेज देण्यास सक्षम आहेत. कारवर फायनान्स प्लॅन उपलब्ध असल्याने तुम्ही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता. कारचे सीएनजी व्हेरियंट 34 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती वॅगन आर LXI CNG किंमत

मारुती सुझुकी वॅगन आर CNG कारची एक्स शोरूम किंमत 6,44,500 रुपये आहे तर याच कारची ऑन रोड किंमत 7,23,801 रुपये होईल. जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे 7,23,801 रुपये असणे आवश्यक आहे. मात्र बजेट कमी असेल तर काळजी करू नका.

मारुती वॅगन आर LXI CNG EMI प्लॅन

मारुती सुझुकी वॅगन आर CNG कार खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 7 लाख रुपये नसतील तर तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे ही कार फक्त 68 हजार रुपये देऊन घरी आणू शकता. 68 हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरून बाकीचे पैसे तुम्ही बँकेकडून कर्ज म्हणून घेऊ शकता.

कार खरेदी करण्यासाठी 68 हजार रुपयांचे डाउनपेमेंट भरल्यानंतर तुम्हाला बँकेकडून 6,55,801 रुपयांचे कर्ज दिले जाईल. या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक 9.8 टक्के व्याजदर आकारले जाईल. वॅगन आर कारसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला पाच वर्षे दरमहा 13,896 रुपयांचा EMI भरावा लागेल.