Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

MG Cars Discount Offer : Hector, Astor, ZS EV कारवर मिळतेय 2 लाखांची मोठी सूट, कसा घेणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

MG च्या कारवर खरेदीवर या महिन्यात लाखोंची मोठी सूट दिली जात आहे. या कार खरेदी करून तुम्ही देखील मोठी पैशाची बचत करू शकता.

0

MG Cars Discount Offer : MG मोटर्स इंडियाकडून दिवाळीनिमित्त त्यांच्या अनेक आलिशान कार्सवर बंपर ऑफर देत आहे. त्यामुळे या भाऊबीज दिवशी नवीन कार खरेदी करून तुम्ही देखील 2 लाखांची मोठी बचत करू शकता.

MG मोटर्सकडून त्यांच्या 5 आणि 7 सीटर मॉडेल्सवर 1.05 लाख रुपयांची सूट देत आहे. यामध्ये 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 25,000 रुपयांची ग्राहक सूट यांचा समावेश आहे.

MG Gloster SUV डिस्काउंट ऑफर

MG कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Gloster SUV एसयूव्ही कारवर 1.35 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. या ऑफरमध्ये 50,000 रुपयांची ग्राहक ऑफर, 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येत आहे. Gloster SUV एसयूव्ही कार खरेदी करून तुम्ही 1.35 लाख रुपयांची बचत करू शकता.

MG Astor डिस्काउंट ऑफर

MG इंडियाकडून त्यांच्या Astor एसयूव्ही कारवर देखील ऑफर देण्यात येत आहे. या कारवर सर्वात मोठी 2.10 लाखांची सूट दिली जात आहे. ही एसयूव्ही कार स्टाईल, सुपर, स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही या पाच व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. व्हेरियंटनुसार कंपनीकडून कारवर सूट दिली जात आहे.

MG ZS EV डिस्काउंट ऑफर

MG कार उत्पादक कंपनीच्या इलेक्ट्रिक कार ZS EV एसयूव्ही कारवर देखील 50,000 रुपयांचा एक्स्चेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि त्यावर 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे ही इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता.

MG Comet डिस्काउंट ऑफर

MG कार कंपनीकडून ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये त्यांची ४ सीटर इलेक्ट्रिक कार Comet उपलब्ध करून दिली आहे. तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. कारण कंपनीकडून Comet इलेक्ट्रिक कारवर 15,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस दिला जात आहे.