Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

MG Cars Price Cut : कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! MG Hector च्या किमतीत लाखोंची कपात, जाणून घ्या व्हेरियंटनुसार किती कमी झाल्या किमती?

MG मोटर कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय Hector कारच्या किमतीमध्ये लाखो कपात करण्यात आली आहे. प्रत्येक व्हेरियंटनुसार किमती कमी करण्यात आल्या आहेत.

0

MG Cars Price Cut : तुम्हीही MG Hector कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण MG Hector आणि MG Hector Plus या कारच्या किमतीमध्ये कंपनीकडून मोठी कपात करण्यात आली आहे.

भारतीय ऑटो बाजारात MG Hector या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कारच्या मागणीमध्ये दर महिन्याला वाढ होत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कारच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

MG Motor इंडियाने Hector आणि Hector Plus SUV च्या किमती 1.37 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्ही कारच्या नवीन किमती जाणून घ्या.

एमजी हेक्टर पेट्रोल व्हेरियंटच्या किमतीत किती कपात?

MG Motor इंडियाने Hector SUV च्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 27,000 ते 66,000 रुपयांनी कमी केलीय आहे. आता या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14.73 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 21.73 लाख रुपये आहे.

एमजी हेक्टर डिझेल व्हेरियंटच्या किमती किती कमी झाल्या?

MG Motor इंडियाने Hector SUV च्या डिझेल व्हेरियंटच्या किमती देखील कमी केल्या आहेत. डिझेल Hector SUV ची किंमत 86,000 ते 1.21 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 17.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 21.51 लाख रुपये आहे.

एमजी हेक्टर प्लस 6 सीटर पेट्रोल व्हेरियंटच्या किमतीत किती कपात?

MG Motor ने त्यांच्या Hector Plus या ७ सीटर एसयूव्ही कारच्या किमतीमध्ये देखील कपात करण्यात आली आहे. MG Hector Plus च्या 6 सीटर पेट्रोल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 66,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कारची नवीन एक्स शोरूम किंमत 20.15 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 22.43 लाख रुपयांपर्यंत आहेत.

एमजी हेक्टर प्लस 6 सीटर डिझेल व्हेरियंटच्या किमतीत किती कपात झाली?

एमजी हेक्टर प्लस 6 सीटर डिझेल व्हेरियंटच्या किमतीमध्ये देखील कपात करण्यात आली आहे. या कारच्या किमतीमध्ये 1.20 लाख रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या कारची सूर्यवतीची एक्स शोरूम किंमत 20.80 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 22.21 लाख रुपये आहे.

MG Hector Plus 7 सीटर पेट्रोल व्हेरियंटच्या किमती किती कमी झाल्या?

एमजी हेक्टर प्लसच्या 7 सीटर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 50 हजार रुपयांनी तर 81,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कारची नवीन एक्स शोरूम किंमत 17.50 लाख ते 22.43 लाख रुपयांपर्यंत आहे.

एमजी हेक्टर ७ सीटर डिझेल व्हेरियंटच्या किमतीत किती कपात?

एमजी हेक्टर ७ सीटर डिझेल व्हेरियंटच्या किमतीत देखील कपात करण्यात आली आहे. या कारच्या डिझेल ७ सीटर व्हेरियंटची किंमत 1.04 लाख रुपये ते 1.37 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत. या कारची नवीन एक्स शोरूम किंमत 19.76 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 22.21 लाख रुपयांपर्यंत आहे.