Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

KIA पासून Mahindra पर्यंत घरी आणा ‘ह्या’ सुपरहिट एसयूव्ही कार्स; किंमत आहे फक्त .. । Mid- Size SUV

तर आज आम्ही तुम्हाला या लेखात स्वस्तात मस्त एसयूव्ही कारची माहिती देणार आहोत ज्यांना तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त मस्त मिड साइज एसयूव्ही कारबद्दल संपूर्ण माहिती.

0

Mid- Size SUV :  दिवसेंदिवस भारतीय बाजारपेठेमध्ये मिड साइज एसयूव्हीची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांना सध्या मिड साइज एसयूव्हीमध्ये उत्तम फीचर्स तसेच बेस्ट मायलेज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बिग स्पेस देखील मिळतो यामुळे ग्राहक आज सेडान कार्सपेक्षा जास्त एसयूव्ही कार्स खरेदी करत आहे.

यातच जर तुम्ही नवीन एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला या लेखात स्वस्तात मस्त एसयूव्ही कारची माहिती देणार आहोत ज्यांना तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त मस्त मिड साइज एसयूव्ही कारबद्दल संपूर्ण माहिती.

Kia Seltos Facelift

सेल्टोस फेसलिफ्ट Kia ने भारतीय बाजारपेठेत अनेक मोठ्या बदलांसह लॉन्च केली आहे. यामध्ये फ्रंट लाईट, बंपर, ग्रिलमध्ये बदल करण्यात आला आहे तर रियरमध्ये बंपर टेल लाईट्ससह अलॉय व्हीलमध्येही बदल करण्यात आला आहे.

या एसयूव्हीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी यामध्ये ADAS सारखे सेफ्टी फीचर्स देखील उपलब्ध आहेत. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर 14 जुलैपासून तिची बुकिंग सुरू आहे, तुम्ही ती बुक करू शकता.

Mahindra Scorpio

महिंद्रा ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात जास्त विक्री होणारी कार कंपनी आहे. त्याची रस्त्याची उपस्थिती देखील चांगली आहे. कंपनीने आपल्या कारचा लूक देखील अतिशय चांगल्या प्रकारे डिझाइन केला आहे जेणेकरून लोकांना त्या पहिल्या नजरेतच आवडतील. या कारमध्ये तुम्हाला सात सीटचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्हाला S आणि S11 असे एकूण दोन व्हेरियंट मिळतात. तर ते डिझेल इंजिनसह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे.

Mahindra Scorpio N

आमच्या यादीत महिंद्राची दुसरी कार आहे. कंपनीने ते गेल्या वर्षी लॉन्च केले होते. क्लासिकच्या तुलनेत त्याची डिजाइन पूर्णपणे बदलली आहे. या एसयूव्हीला पेट्रोल डिझेलसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रिम्स मिळतात. या कारची एक्स-शोरूम किंमत 13.05 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 20.20 लाख रुपये आहे.

Mahindra SUV 700

Mahindra SUV 700 अनेक शक्तिशाली फीचर्ससह येते. यासोबतच हे तुम्हाला लक्झरी फील देखील देईल. सुरक्षेसाठी यात ADAS फीचर देखील आहे. या कारची सुरुवातीची किंमत 17.42 लाख रुपये आहे जी 26.18 लाख रुपयांपर्यंत जाते. यामुळे जर तुम्ही नवीन मिड साइज एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल ह्या पैकी एक एसयूव्ही कार तुमच्यासाठी सर्वात भारी ठरू शकते.