Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mid- Size SUVs Cars : शक्तिशाली इंजिनसह दमदार कामगिरी! या मिड साईझ SUV ची बाजारात प्रचंड क्रेझ, किंमत 10 लाखांपासून सुरु

नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ऑटो बाजारात अनेक मिड साईझ एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील १० लाख रुपयांपासून सुरु होते.

0

Mid- Size SUVs Cars : भारतीय ऑटो बाजारात सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. या शक्तिशाली एसयूव्ही कारला बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या मिड साईझ एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. बाजारात अनेक कंपन्यांच्या मिड साईझ एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत. त्यामुळे कमी बजेट ग्राहक या एसयूव्ही कार खरेदी करू शकता.

kia seltos फेसलिफ्ट

Kia seltos फेसलिफ्ट कार नुकतीच भारतीय ऑटो बाजारात सादर करण्यात आली आहे. सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारपैकी ही एक आहे. कारमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. कारच्या फ्रंट लाईट्स, बंपर आणि ग्रिलमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मागील बाजूस बंपर टेल लाईट्ससह अलॉय व्हील्समध्येही बदल पाहायला मिळत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची स्कॉर्पिओ एसयूव्ही कार देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. या कारमध्ये ग्राहकांना ७ सीटर पर्याय ऑफर करण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे.

महिंद्रा XUV 700

महिंद्राची आणखी एक XUV 700 कार एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये ADAS फीचर देण्यात आले आहे. कंपनीकडून कारच्या किमतीमध्ये देखील वाढ केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 14.03 लाख रुपये आहे.

ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाई क्रेटा ही भारतातील सर्वाधिक पसंतीची एसयूव्ही कार आहे. या मध्यम आकाराच्या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही कार ग्राहकांना एकूण ६ व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत 10.87 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि एसी फ्रंट सीट अशी वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.