Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Mileage Bikes : कमी किंमत दमदार मायलेज! 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या बाईक्स, पहा यादी

कमी किमती शानदार बाईक्स खरेदीचा विचार असेल तर तुमच्यासाठी ऑटो बाजारात बजाजपासून हिरोपर्यंत अनेक बाईक्स उपलब्ध आहेत. या बाईकच्या किमती देखील १ लाख रुपयांपेक्षा कमी आहेत.

0

Mileage Bikes : ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या शानदार बाईक्स उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. सर्वसामान्यांना खरेदी न करता येण्यापलीकडे या बाईक्सच्या किमती आहेत. मात्र जर तुमचे बजेट १ लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही देशातील दमदार मायलेज बाईक्स खरेदी करू शकता.

तुमचेही कमी बजेटमध्ये शानदार बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण आज १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील बाईक्सबद्दल सांगणार आहोत. हिरोपासून बजाजपर्यंतच्या बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत.

बजाज प्लॅटिना 100

कमी बजेटमध्ये शानदार बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बजाज प्लॅटिना 100 बाईक सर्वोत्तम पर्याय आहे. अनेक वर्षांपासून या बाईक्सची बाजारात क्रेझ सुरु आहे. या बाईकमध्ये 102 सीसी इंजिन देण्यात आले आहे.

हे इंजिन 7.79 bhp आणि 8.3 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाईक 70 Kmpl मायलेज देते. बजाज प्लॅटिना 100 बाईकची एक्स शोरूम किंमत 65,856 रुपये आहे. त्यामुळे ही बाईक तुम्ही सहज खरेदी करू शकता.

TVS स्पोर्ट

TVS कंपनीची स्पोर्ट बाईक देखील अगदी कमी बजेटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. या बाईकला देखील ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बाईकमध्ये 109 cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7350 rpm वर 8.29 bhp आणि 4500 rpm वर 8.7 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

बाईक 70 kmpl मायलेज देते. TVS स्पोर्ट किक स्टार्ट व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 64,050 रुपये आहे आणि सेल्फ-स्टार्ट व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 70,223 रुपये आहे. त्यामुळे कमी बजेट ग्राहकांसाठी ही बाईक सर्वोत्तम पर्याय आहे.

स्प्लेंडर

हिरो कंपनीची स्प्लेंडर बाईकचा 30 वर्षांपासून प्रवास सुरु आहे. ऑटो मार्केटमध्ये ही बाईक ३० वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. बाईकमध्ये 97.2 cc एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.91 bhp आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बाईकची एक्स शोरूम किंमत 71,586 रुपये आहे.