Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

MS Dhoni Cars Collection : स्टार क्रिकेटर MS धोनीने खरेदी केली ही आलिशान सुपर कार, किंमत पाहून फिरतील डोळे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. तसेच आता धोनीने आणखी एक आलिशान फीचर्स असलेली सुपर कार खरेदी केली आहे.

0

MS Dhoni Cars Collection : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे अनेक कंपन्यांच्या लक्झरी फीचर्स आलिशान कार आहेत. धोनी क्रिकेट इतकेच कारवर देखील प्रेम करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

MS धोनीकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनेक कार आहेत. त्यांच्या घरी कार आणि बाईकसाठी एक स्वतंत्र पार्किंग असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. धोनी अनेकदा वेगवेगळ्या कार किंवा बाईकची राईड घेत असतो.

महेंद्रसिंग धोनी नुकताच मर्सिडीज-एएमजी जी63 एसयूव्ही कार चालवताना दिसून आला आहे. महेंद्रसिंग धोनीने त्याच्या कार पार्किगमध्ये आणखी एक Mercedes-AMG G63 SUV आलिशान कार सामील केली आहे.

महेंद्रसिंग धोनीने खरेदी केलेल्या Mercedes-AMG G63 SUV कारचा नंबर देखील VIP असल्याचे दिसून आले आहे. धोनीच्या Mercedes-AMG G63 SUV कारचा नंबर 0007 आहे. महेंद्रसिंग दोन्ही क्रिकेट खेळताना देखील ७ नंबरची जर्सी घालतो.

Mercedes-Benz India या कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. या वर्षी २०२३ मध्ये त्यांनी Mercedes-AMG G63 SUV कारची किंमत 75 लाख रुपयांनी वाढवली आहे.

आता Mercedes-AMG G63 या कारची एक्स शोरूम किंमत 3.30 कोटी रुपये झाली आहे. ही कार खरेदीसाठी ग्राहकांना 12 ते 16 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

मर्सिडीज-एएमजी जी 63 इंजिन

मर्सिडीज कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या AMG G 63 कारमध्ये 4-लिटर V8 ट्विन-टर्बो इंजिन दिले आहे जे ५७७ bhp पॉवर आणि ८५० Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 9-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरशी जोडलेले आहे.

एमएस धोनीचे विदेशी कार संग्रह

महेंद्रसिंग धोनीकडे अनेक ऑफ रोडींग एसयूव्ही कार आहेत. त्यामुळे धोनीला ऑफ रोडींग ड्रायव्हिंग खूप आवडत असल्याचे दिसते. त्याच्याकडे निसान जोंगा, हमर एच2 आणि जीप चेरोकी ट्रॅकहॉक देखील आहे.