Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

New Bikes In July : या महिन्यात लॉन्च होणार तीन जबरदस्त बाईक! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

भारतीय ऑटो बाजारात आणखी ३ नवीन बाईक या जुलै महिन्यामध्ये लॉन्च होणार आहेत. बाईक प्रेमींना आणखी ३ नवीन शक्तिशाली बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

0

New Bikes In July : भारतीय ऑटो बाजारासाठी जुलै २०२३ हा महिना अतिशय खास ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक आणि कार लॉन्च होणार आहेत. आता हा महिना बाईक प्रेमींसाठी देखील महत्वाचा आहे.

जुलै महिन्यामध्ये ३ बाईक्स लॉन्च होणार आहेत. कोणत्या कंपनीच्या या बाईक्स आहेत आणि त्या बाईक्समध्ये काय जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत याबद्दल जाणून घेऊया.

हार्ले डेव्हिडसन 400

हार्ले डेव्हिडसन कंपनीकडून त्यांची आणखी एक बाईक भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात X440 ही बाईक लॉन्च केली जाणार आहे. भारतीय कंपनी Hero MotoCorp च्या भागीदाराने अमेरिकन कंपनी Harley Davidson कडून ही बाईक भारतात लॉन्च केली जाणार आहे.

कंपनीकडून या बाईकमध्ये 440 सीसी इंजिन देण्यात येणार आहे. Harley Davidson कडून भारतातील आतार्यंतची सर्वात शक्तीशाली बाईक लॉन्च केली जाणार आहे. या बाईकची भारतातील किंमत अडीच ते तीन लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बाईकचे 440 cc इंजिन 25 ते 30 bhp पॉवर जनरेट करेल असा कंपनीकडून दावा करण्यात येत आहे. या बाईकमध्ये ड्युअल एबीएस, डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, अॅप असे अनेक फीचर्स देण्यात येणार आहेत.

ट्रायम्फ स्पीड 400

भारतामध्ये ब्रिटिश बाईक निर्माता ट्रायम्फकडून देखील एक बाईक लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून भारतामध्ये पहिली बाईक स्पीड 400 असेल. कमानीची सर्वात शक्तिशाली बाईक असणार आहे. या बाईकमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, 398 सीसी इंजिन, एबीएस, यूएसडी फोर्क्स, मोनोशॉक सस्पेंशन, ट्यूबलेस टायर्स अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.

५ जुलै रोजी ट्रायम्फ स्पीड 400 ही बाईक भारतामध्ये लॉन्च होणार आहे. या बाईकची भारतातील संभाव्य किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असू शकते. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही शक्तिशाली बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळू शकतो.

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये 5 जुलै रोजी ट्रायम्फची आणखी एक Scrambler 400X बाईक लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे बाईक खरेदीदारांना आणखी एक बाईक खरेदी करण्याचा पर्याय मिळणार आहे. या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलसीडी टचस्क्रीन, यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट, राईड बाय वायर थ्रॉटल, सर्व एलईडी लाईट्स, स्टीयरिंग लॉक आणि अँटी थेफ्ट इमोबिलायझर अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत.